- मेष:-
काही गोष्टींबाबत तोल ढळणार नाही याची काळजी घ्यावी. करमणूकप्रधान कार्यक्रम बघाल. खेळत मन रमेल. मन:शांती लाभेल. घरातील टापटीपीवर भर द्याल. - वृषभ:-
प्रवास मजेत होईल. संवेदनशीलपणे विचार कराल. सर्व माहिती नीट समजून घ्याल. स्वभावातील लहरीपणा दूर सारावा. नवीन वस्त्रे खरेदी कराल. - मिथुन:-
बोलण्यातून मार्दवता दाखवाल. आवडीची कामे प्रथम कराल. घरातील कामे आनंदाने कराल. पारंपारिक कामात गढून जाल. कौटुंबिक खर्चाचा विचार करावा. - कर्क:-
कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पार पाडाल. गप्पांमध्ये रंगून जाल. चमचमीत पदार्थ खाल. काही गोष्टी भडकपणे दर्शवू नका. हसत-हसत वेळ घालवावा. - सिंह:-
चटकन मत दर्शवू नये. चैन करण्यावर भर द्याल. हातातील कामावर लक्ष द्यावे. कामाचा आवाका लक्षात घेवून वेळेचे नियोजन करावे. संयम राखावा लागेल. - कन्या:-
कामात स्त्रियांची मदत मिळेल. मैत्रीतील आपुलकी वाढीस लागेल. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करा. आधुनिकतेची आवड जोपासाल. कमी श्रमात कामे पार पडतील. - तुळ:-
अपेक्षित लाभाने खुश असाल. मनातील अपेक्षा पूर्ण होतील. मैत्रीचे संबंध जपावेत. आलेल्या संधीचा लाभ घ्यावा. कामाला चांगली गती प्राप्त होईल. - वृश्चिक:-
तुमची उर्जितावस्था वाढीस लागेल. सरकारी कामे वेळ घेतील. व्यावसायिकांनी अडचणींवर लक्ष द्यावे. निरपेक्ष मदतीचा आनंद घ्याल. आपल्याच मतावर ठाम राहाल. - धनु:-
दुखण्यांकडे दुर्लक्ष करु नका. मतवैचित्र्य दर्शवू नका. समजूतदारपणा दाखवावा लागेल. काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील. फार काळजी करू नये. - मकर:-
चुकीच्या कल्पना बाजूला साराव्यात. काही कामे सहजपणे पार पडतील. वरिष्ठांशी मिळते-जुळते घ्यावे. एकमेकांतील आपुलकीची भावना वाढीस लागेल. भागीदारीत समाधानी राहाल. - कुंभ:-
जोडीदाराची कमाई वाढेल. चुकीच्या संगतीत अडकू नका. एकमेकांवरील विश्वास महत्वाचा आहे. जोडीदाराचे वर्चस्व राहील. सामंज्यस्य दाखवावे लागेल. - मीन:-
सहजपणे मिळणाऱ्या गोष्टींकडे लक्ष राहील. आवडते छंद जोपासायला वाव मिळेल. कामगारांवर लक्ष ठेवावे. मुलांच्या आनंदात रमून जाल. जुगाराची हौस पूर्ण कराल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा