मेष
मोठ्या निर्णयांसाठी उत्तम दिवस आहे. त्यामुळे मागील कामांचा पाठपुरावा करावा. पुढील कामांच्या संदर्भात योजनांच्या गाठीभेटी घ्याव्यात. निशिगंधाचे फूल दत्त महाराजांना अर्पण करावे.
आजचा रंग – पिवळा
वृषभ
चित्त स्थिर ठेवून दिवस व्यतित करावा. वाद वाढणार नाही याची काळजी घ्यावी. वेळेचे नियोजन करावे. वाहने सावकाश चालवावी. गुरू मंत्राचा जप सुरू ठेवावा.
आजचा रंग – पांढरा
मिथुन
चंद्राचे धनु भ्रमण राशीतील व्यावसायिकांना जास्त लाभदायक असणार आहे. उधारी वसुलीसाठी आज नियोजन करुन पाठपुरावा करावा. स्त्रियांना अनुकूल वातावरण उत्साही राहाल. ओम मिऋतये नमः हा जप करावा.
आजचा रंग – हिरवा
कर्क
चंद्राचे धनु राशीत भ्रमण असणार आहे. त्यामुळे सावध राहावे. वरिष्ठांशी, ज्येष्ठांशी वाद वाढवू नये. वितुष्ट वाढवू नये. आज सावध राहावे. कुणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. ओम आदि गुरवे नमः जप करावा.
आजचा रंग – तपकिरी
सिंह
चंद्राचे धनु राशीत भ्रमण असणार आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना योग्य दिवस आहे. नवीन संधी उपलब्ध होतील. सर्व क्षेत्रातील लोकांना शुभ दिवस आहे. प्रवास वाढेल पण उत्साह टिकून राहील. ओम द्रां दत्तात्रयाय नमः हा जप करणे.
आजचा रंग – निळा
कन्या
चंद्राचे धनु राशीत भ्रमण असणार आहे. कन्या राशीला हे फारसे लाभदायक नाही. मोठे निर्णय टाळावेत. विद्यार्थ्यांनी सावध राहावे. कायद्याचे, आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. ओम द्रां दत्तात्रयाय नमः हा जप करावा.
आजचा रंग – निळा
तुळ
चंद्राचे धनु राशीत भ्रमण असणार आहे. अधिकारी वर्गासाठी कामांचा ताण वाढेल, परंतु उत्साह टिकेल. कामाची गती कौतुकास्पद असेल. दत्त मंदिरात पांढरी फूले अर्पण करावी.
आजचा रंग – नारंगी
वृश्चिक
गुरू आणि चंद्राच्या योगामुळे आज वृश्चिकेच्या व्यक्तींना दिवसाच्या पहिल्या प्रहरापासून आनंद आणि उत्साह जाणवेल. दीर्घकालीन योजना आखण्यासाठी उत्तम स्थिती आहे. घरांचे व्यवहार, मुलांसाठीच्या आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. ओम श्रीं आदि गुरवे नमः चा जप करावा.
आजचा रंग – नारंगी
धनु
आजचा दिवस धनु राशीच्या व्यक्तींना विशेष असणार आहे. आज बऱ्याच दिवसांनी चांगले ग्रह योग आहेत. त्याचा पूर्ण लाभ घ्यावा. सर्व क्षेत्रातील व्यक्तींना शुभ योग आहेत. ओम गुरवे नमः जप करणे.
आजचा रंग – गुलाबी
मकर
आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत असणार आहे. प्रवासाचे योग, दगदग वाढेल, नियोजनपूर्ण कामे करावे, धावपळ वाढू नये म्हणून काळजी घेणे. जामीन राहू नये, कर्ज प्रकरणे आज घेऊ नये.
आजचा रंग – पिवळा
कुंभ
चंद्राचे धनु राशीत भ्रमण असणार आहे. स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटतील, नवीन वाहनांचा योग, घरांतील सदस्यांशी जुळवून घेता येईल. दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – तपकिरी
मीन
चंद्राचे धनु राशीत भ्रमण असणार आहे. कामानिमित्त मोठ्या प्रवासाचे योग आहेत. उत्साहाचा दिवस, चांगला कामांचे कौतुक होईल, शुभवार्ता समजेल. गुरुचरित्राचा १४ वा अध्याय वाचावा.
आजचा रंग – नारंगी
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu