मेष
आर्थिक स्थिती चांगली राहील. बॅंकेची कामे कर्ज प्रकरणे मार्गी लावू शकाल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. कणकधारा स्त्रोत्र म्हणावे.
आजचा रंग – राखाडी
वृषभ
मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला-मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा
मिथुन
मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. प्रवासाचे योग आहेत. वाहने जपून चालवावीत कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा, ताण तणाव कमी होतील. गणेश अष्टकाचे पाठ करावेत.
आजचा रंग – तपकिरी
कर्क
मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सर्व प्रकारचे कामांसाठी उत्तम दिवस आहे. महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी, करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. सहकार्य लाभेल. व्यवसायात प्रगती कराल. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. संतती विषयीचे प्रश्न मार्गी लागतील. गुरुचरित्र पारायण करावे.
आजचा रंग – गुलाबी
सिंह
मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. कुठलेही धाडस करू नये, साधारण दिवस आहे. वाहने जपून चालवावीत, नवीन संधीचा पाठपुरावा करावा. वडिलधाऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्याल. श्री गुरुनाथाय नमः हा जप करावा.
आजचा रंग – पांढरा
कन्या
मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. नवीन संधी येतील त्याचा पाठपुरावा करावा. कामाचा ताणतणाव कमी होईल. उलाढाली जपून कराव्यात, आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा
तुळ
मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज आर्थिक व्यवहार जपून करावेत. कुणालाही जामीन राहू नये. वाहनांची काळजी घ्यावी. दगदगीचा प्रवास संभवतो. नवीन संधीचा पाठपुरावा करावा, आर्थिक चिंता कमी होतील. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – आकाशी
वृश्चिक
मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांसाठी, नवीन गाठीभेटीसाठी उत्तम दिवस आहे. मुलांमध्ये वेळ घालवता येईल. नोकरी व्यवसायात उत्तम संधीचे योग आहेत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. दिवसभर गुरू स्मरण करावे.
आजचा रंग – पिवळा
धनु
नोकरीत व्यवसायात मोठ्या संधीचे योग आहेत. नोकरीत मोठी संधी प्राप्त होईल, वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, कामाचे कौतुक होईल. व्यवसायात नवीन संधीचा पाठपुरावा करावा. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. गुरू मंत्र जप करावा.
आजचा रंग – पांढरा
मकर
मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊन नये. आर्थिक उलाढाली सावधपणे कराव्यात. व्यवसायात प्रगती कराल. सहकार्य लाभेल. दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये अन्नदान करावे.
आजचा रंग – पिवळा
कुंभ
मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आजचा दिवस साधारण प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी निर्णय घाईघाईने घेऊ नये. गृहिनींनी प्रकृतीची काळजी घ्यावी. पुरुष सुक्ताचे पाठ करावेत.
आजचा रंग – नारंगी
मीन
मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. जुन्या योजना कार्यान्वित करण्यासाठी उत्तम दिवस आहे. नोकरीत बढतीचे योग आहेत. गृहिणींनी आनंदी दिवस जाईल. श्री गुरुवै नमः या नामाचा जप करावा.
आजचा रंग – गडद लाल
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu