- मेष:-
गप्पा-गोष्टींमधून मैत्रीचे संबंध वाढतील. पित्ताचा त्रास जाणवेल. कामात अधिक प्रयत्न करावा लागेल. आळस बाजूला सारून कामे हाती घ्यावीत. घरगुती कामासाठी प्रवास करावा लागेल. - वृषभ:-
कामात प्रगतीला वाव आहे. मानसिक शांतता लाभेल. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित कराल. हातातील कामात यश येईल. मौजमजेकडे अधिक लक्ष द्याल. - मिथुन:-
कामाची धावपळ वाढेल. मुलांसोबत मतभेद होतील. घरातील काही अडचणी दूर कराव्यात. जोडीदाराविषयी मनातील ग्रह काढून टाकावा. गप्पांमध्ये रमाल. - कर्क:-
नवीन वाहन घेण्याचा विचार केला जाईल. घरातील वातावरण खेळकर राहील. घर सजवले जाईल. वातविकार संभवतात. एखाद्या तत्त्वज्ञानासारचे वागाल. - सिंह:-
कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. पित्तविकाराचा त्रास जाणवेल. प्रवासात नवीन मित्र जोडाल. तुमचा संपर्क वाढेल. - कन्या:-
रागावर नियंत्रण ठेवावे. कामाचा व्याप वाढू शकतो. तडकाफडकी निर्णय घेवू नका. वेळेचे योग्य नियोजन करावे. खर्च जपून करावा. - तूळ:-
दिवस मजेत घालवाल. गप्पा-गोष्टीत रस घ्याल. व्यवसायिक लाभाने संतुष्ट व्हाल. झोपेची तक्रार जाणवेल. कामात चिकाटी ठेवावी. - वृश्चिक:-
मोठ्या लोकांच्या संपर्कात याल. नवीन उर्जेने कामे कराल. आर्थिक गणिते जुळून येतील. जमिनीची कामे निघतील. घरासाठी मोठी वस्तू खरेदी कराल. - धनु:-
सरकारी कामात दिवस जाईल. कामातील बदलांकडे लक्ष ठेवा. कला इतरांसमोर सादर कराल. दिरंगाईतून मार्ग काढाल. हितशत्रूंकडे बारीक लक्ष ठेवा. - मकर:-
कामाची धांदल उडेल. धावपळीत दिवस जाईल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. वरिष्ठांना खुश करावे. स्वत:चा मान जपावा. - कुंभ:-
आर्थिक लाभ चांगले होतील. धार्मिक यात्रा काढाल. कमिशनमधून फायदा होईल. सहृदयतेने वागणूक ठेवाल. जोडीदाराशी मतभेद टाळावेत. - मीन:-
भागीदारीत सलोखा वाढवावा. जोडीदाराचा वरचष्मा राहील. समोरच्याची बाजू समजून घ्याल. उत्तम धनलाभ संभवतो. परोपकाराची जाणीव ठेवाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, मंगळवार, १ ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 01-10-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 01 october 2019 aau