मेष:- तुमच्या मनातील आकांक्षा पूर्ण होतील. पत्नीशी मतभेद संभवतात. काहीसा सुखासक्तपणा जाणवेल. स्त्रीसमूहात वावराल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. वृषभ:- सामाजिक वजन वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कामात एकसूत्रता ठेवावी. उष्णतेचे त्रास जाणवतील. इतरांचा सल्ला घेतांना विचार करावा. मिथुन:- बौद्धीक खेळ खेळाल. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्यावेत. धार्मिक कामात हातभार लावाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. कर्क:- भावनेच्या आहारी जाऊ नका. घरगुती प्रश्न सोडवाल. अचानक धनलाभ संभवतो. ज्ञानाचा सदुपयोग कराल. नातेवाईकांशी संबंध जपावेत. सिंह:- उत्तम वैवाहिक सौख्य राहील. एकमेकांची बाजू समजून घ्याल. प्रेमभावना वाढीस लागेल. ठाम निर्णय घ्याल. धाडसाने कामे हाती घ्याल. कन्या:- उगाच चिडचिड करणे टाळावे. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नका. परिस्थितीवर चिडू नका. मानसिक अस्थिरता जाणवेल. आत्मविश्वास बाळगावा. तूळ:- कल्पना विश्वात रममाण व्हाल. संवेदनशीलपणे विचार कराल. स्वच्छंदीवृत्तीने वागाल. मानसिक व्यग्रता जाणवेल. जुगाराची आवड पूर्ण कराल. वृश्चिक:- घरात कर्तेपणाचा मान मिळवाल. कामाची धावपळ राहील. चिकाटीने कामे करत राहावे. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. गायन कलेला प्रोत्साहन मिळेल. धनु:- झोपेची तक्रार राहील. जवळचा प्रवास घडेल. स्वकष्टावर भर द्याल. विविध विषयात रुची दाखवाल. छान जोपासण्यासाठी वेळ काढाल. मकर:- कौटुंबिक आनंदात रमून जाल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. समाजिक सेवेत सहभाग घ्याल. काही गोष्टीत क्षणिक आनंद मिळेल. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. कुंभ:- मनात नवीन कल्पना रूजतील. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल. मनातील आकांक्षांची पूर्तता होईल. मोठ्या लोकांच्यात वावराल. हातातील कामात यश येईल. मीन:- मानसिक व्यग्रता जाणवेल. व्यावसायिक पातळीवर सतर्कता ठेवावी. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. आपला मान जपण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या विरोधाला सामोरे जावे लागेल. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर