- मेष:-
तुमच्या मनातील आकांक्षा पूर्ण होतील. पत्नीशी मतभेद संभवतात. काहीसा सुखासक्तपणा जाणवेल. स्त्रीसमूहात वावराल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. - वृषभ:-
सामाजिक वजन वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कामात एकसूत्रता ठेवावी. उष्णतेचे त्रास जाणवतील. इतरांचा सल्ला घेतांना विचार करावा. - मिथुन:-
बौद्धीक खेळ खेळाल. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्यावेत. धार्मिक कामात हातभार लावाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. - कर्क:-
भावनेच्या आहारी जाऊ नका. घरगुती प्रश्न सोडवाल. अचानक धनलाभ संभवतो. ज्ञानाचा सदुपयोग कराल. नातेवाईकांशी संबंध जपावेत. - सिंह:-
उत्तम वैवाहिक सौख्य राहील. एकमेकांची बाजू समजून घ्याल. प्रेमभावना वाढीस लागेल. ठाम निर्णय घ्याल. धाडसाने कामे हाती घ्याल. - कन्या:-
उगाच चिडचिड करणे टाळावे. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नका. परिस्थितीवर चिडू नका. मानसिक अस्थिरता जाणवेल. आत्मविश्वास बाळगावा. - तूळ:-
कल्पना विश्वात रममाण व्हाल. संवेदनशीलपणे विचार कराल. स्वच्छंदीवृत्तीने वागाल. मानसिक व्यग्रता जाणवेल. जुगाराची आवड पूर्ण कराल. - वृश्चिक:-
घरात कर्तेपणाचा मान मिळवाल. कामाची धावपळ राहील. चिकाटीने कामे करत राहावे. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. गायन कलेला प्रोत्साहन मिळेल. - धनु:-
झोपेची तक्रार राहील. जवळचा प्रवास घडेल. स्वकष्टावर भर द्याल. विविध विषयात रुची दाखवाल. छान जोपासण्यासाठी वेळ काढाल. - मकर:-
कौटुंबिक आनंदात रमून जाल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. समाजिक सेवेत सहभाग घ्याल. काही गोष्टीत क्षणिक आनंद मिळेल. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. - कुंभ:-
मनात नवीन कल्पना रूजतील. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल. मनातील आकांक्षांची पूर्तता होईल. मोठ्या लोकांच्यात वावराल. हातातील कामात यश येईल. - मीन:-
मानसिक व्यग्रता जाणवेल. व्यावसायिक पातळीवर सतर्कता ठेवावी. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. आपला मान जपण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या विरोधाला सामोरे जावे लागेल.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 03-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 03 december 2019 aau