- मेष:-
वैवाहिक सौख्यात भर पडेल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या काही गोष्टी समजून घ्याव्यात. ज्ञानाचा सदुपयोग होईल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. - वृषभ:-
कामात गतिमानता येईल. व्यावसायिक लाभ उठवाल. तुमचे धैर्य व हिंमत वाढेल. घरगुती गोष्टींमध्ये अधिक अडकून पडाल. कौटुंबिक खर्चावर लक्ष द्यावे. - मिथुन:-
कर्तबगारीला चांगला वाव आहे. प्रगल्भ विचार दर्शवाल. प्रवासात काळजी घ्यावी. हातातील कलेतून आनंद मिळवाल. आवडते साहित्य वाचाल. - कर्क:-
कौटुंबिक खर्चाचे भान राखाल. आवडीचे पदार्थ खाण्यावर भर द्याल. बोलताना संयम राखावा. जबाबदारीची जाणीव ठेवाल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. - सिंह:-
दूरवरच्या प्रवासाचा योग येईल. नवीन उत्साहाने कामे हाती घ्याल. बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. काही कामे दिरंगाईने पार पडतील. - कन्या:-
व्यावसायिक लाभाने संतुष्ट असाल. प्रत्येक गोष्टीत चोखंदळपणा दाखवाल. सामुदाईक भान राखावे. काटकसरीने वागाल. जुनी कामे समोर येतील. - तूळ:-
मौजमजेत दिवस घालवाल. नवीन कार्यक्षेत्राचा विचार कराल. नवीन मैत्री जपण्याचा प्रयत्न करावा. घरासाठी मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. तुमचा दर्जा सुधारेल. - वृश्चिक:-
किरकोळ अडचणीतून मार्ग काढावा लागेल. मानसिक सौख्य चांगले लाभेल. घरगुती समारंभात भाग घ्याल. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. मोठ्या लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. - धनु:-
तुमच्या कामाची वाखाणनी केली जाईल. चुकीच्या कामात अडकू नका. गुरुकृपेचा लाभ घ्यावा. मदत करण्याचा आनंद मिळेल. योग्यवेळी मदत मिळेल. - मकर:-
कामात पत्नीचे सहकार्य मिळेल. जोडीदारास चांगली आर्थिक प्राप्ती होईल. गैरसमजाला मनात थारा देवू नये. अचानक धनलाभाची शक्यता. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. - कुंभ:-
एकमेकांमधील ओढ वाढीस लागेल. भागीदातून चांगला फायदा संभवतो. मनातील श्रद्धा ढळू देवू नका. ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. जोडीदाराला लाभ होतील. - मीन:-
हाताखालील लोकांकडून कामे करुन घ्यावीत. आरोग्यात सुधारणा होईल. विरोधकांवर मात करणे शक्य होईल. कामातून चांगली प्राप्ती संभवते. कामे वेळेत पार पडतील.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 03-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 03 september 2019 aau