- मेष ः
ॐ वासुदेवाय नमः
आजचा शुभ रंग नारंगी आहे.
कामाचा ताण जाणवेल.
नोकरदारांना, गृहिणींना अतिरीक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे.
आर्थिक नियोजन उत्तम राहिल.
स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल. - वृषभ ः
ॐ गजवदनाय नमः
आजचा शुभ रंग हिरवा आहे.
आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
जुनी येणी वसूल करु शकाल.
नोकरीमध्ये बढतीचे, पगार वाढीचे योग आहेत.
व्यवसायिकांना उत्तम आर्थिक आवाक्याचा दिवस आहे. - मिथुन ः
ॐ पार्वतीनंदनाय नमः
आजचा शुभ रंग पांढरा आहे.
महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
व्यवसायीक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल.
महत्त्वाकांक्षी योजनांची आखणी करावी. - कर्क ः
ॐ आदिनाथाय नमः
आजचा शुभ रंग पिवळा आहे.
आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत.
वादविवाद टाळावेत.
कौटुंबीक सौख्य लाभेल.
बांधकाम व्यवसायीक, जमिनीचे खरेदी-विक्री करणारे व्यवसायिक यांनी विशेष दक्षता बाळगावी.
नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. - सिंह ः
ॐ शंकराय नमः
आजचा शुभ रंग गुलाबी आहे.
सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत.
महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा.
स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल.
कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल.
प्रवासाचे योग संभवतात.
आर्थिक स्थिती उत्तम राहिल. - कन्या ः
ॐ परब्रम्हणे नमः
आजचा शुभ रंग लाल आहे.
अधिकारी वर्गांसाठी उत्तम ग्रहमान आहेत.
महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करु शकाल.
आर्थिक नियोजन उत्तम राहिल.
मोठे व्यवसायिक धाडस करु शकाल. - तुळ ः
ॐ कैवल्याय नमः
आजचा शुभ रंग पांढरा आहे.
लाभदायक ग्रहमान आहेत.
व्यवसायिकांना, नोकरदार मंडळींना आणि गृहिणींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.
संततीशी निगडीत अडी-अडचणी सोडवू शकाल.
परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणार्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. - वृश्चिक ः
ॐ वातात्मजाय नमः
आजचा शुभ रंग आकाशी आहे.
व्यवसायिक उलाढाल जपून करावी.
महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचार विनिमय करावा.
प्रवास जपून करावेत.
वरिष्ठांची मर्जी राखावी.
मोठी आर्थिक उलाढाल करु नये. - धनु ः
ॐ वैष्णवे नमः
आजचा शुभ रंग केशरी आहे.
व्यवसायीक स्थिरता लाभेल.
नोकरदार मंडळींना दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.
कुटुंबाशी निगडीत अडी-अडचणी सोडवू शकाल.
शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत.
कुटुंबासमवेत प्रवासाचे योग संभवतात. - मकर ः
ॐ विणये नमः
आजचा शुभ रंग नारंगी आहे.
प्रकृतीची काळजी घ्यावी.
पचनाशी निगडीत आजार संभवतात.
व्यवसायामध्ये सावधानता बाळगावी.
वादविवाद टाळावेत.
वाहने जपून चालवावीत. - कुंभ ः
ॐ ब्रम्हमुर्तये नमः
आजचा शुभ रंग राखाडी आहे.
संतती सौख्य लाभेल.
कुटुंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल.
व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल.
कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत.
मोठे निर्णय घेऊ शकाल. - मीन ः
ॐ परमेश्वराय नमः
आजचा शुभ रंग पिवळा आहे.
कौटुंबीक सौख्य लाभेल.
राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल.
आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
बांधकाम व्यवसायीक, फर्निचर, गृहोपयोगी वस्तू आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्यांसाठी उत्तम ग्रहमान.
प्रवासाचे योग संभवतात.
कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल.— डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu
आजचे राशीभविष्य, मंगळवार, ४ जून २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 04-06-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 04 june