मेष:- दिवसभर कामात गुंतून राहाल. घरगुती कामात अधिक रस घ्याल. समाजिक वजन वाढेल. कामात वारंवार बदल करू नका. जोडीदाराची धावपळ वाढेल. वृषभ:- धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. काही सूचक स्वप्ने पडतील. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. मिथुन:- अचानक धनलाभ संभवतो. मानसिक शांतता जपावी. प्रकृतीच्या बाबतीत कोणतीही हयगय करू नये. घरगुती प्रश्न संयमाने सोडवाल. छुप्याशत्रूंचा त्रास जाणवेल. कर्क:- वैवाहिक सौख्यात भर पडेल. भागीदारीत समाधानी असाल. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. अधिकारात वाढ होईल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. सिंह:- तिखट व तामसी पदार्थ खाण्याची आवड पूर्ण कराल. कौटुंबिक शांतता जपावी. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. काही कामे धाडसाने हाती घ्याल. तुमचा दर्जा सुधारेल. कन्या:- भाजणे, कापणे यांसारखे त्रास संभवतात. वादविवादात अडकू नका. रागावर नियंत्रण ठेवावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. कौटुंबिक खर्च नियंत्रित ठेवावा. तूळ:- कामाचे योग्य नियोजन करावे. गोड वाणीने सर्वांना जिंकून घ्याल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. सामुदायिक गोष्टींचे भान राखावे. वृश्चिक:- झोपेची तक्रार जाणवेल. मैत्रीचे संबंध जपावेत. खर्चाचे भान राखावे. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. वक्तृत्वाची आवड पूर्ण कराल. धनु:- काही बदलांकडे सकारात्मकतेने पाहावे. काही कामे अधिक कस पाहतील. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. गोड पदार्थ खायला मिळतील. मकर:- दिवस मजेत जाईल. उपासनेत अधिक वेळ घालवाल. सरकारी कामात वेळ जाईल. प्रवासात काळजी घ्यावी. मोठ्या व्यक्तींचा आदर करावा. कुंभ:- मानसिक व्यग्रता जाणवेल. तुमच्या कलेला चांगला प्रतिसाद मिळेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. अडचणीतून मार्ग काढाल. मनातील निराशा दूर सारावी. मीन:- भागीदारीत सलोखा वाढवावा. कौटुंबिक शांतता जपावी. सुखासक्तपणा जाणवेल. परोपकाराने वागाल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर