• मेष:-
    आत्मविश्वास ढळू देवू नका. कामाचा आनंद व समाधान दोन्हीचा लाभ होईल. गप्पांमध्ये रमाल. दिवस ऐशारामात घालवाल. शेतीतून चांगला लाभ होईल.
  • वृषभ:-
    स्वानुभवातून नवीन शिकायला मिळेल. मुलांच्या सहवासात आनंदी असाल. चैनीची व जुगाराची आवड पूर्ण कराल. अचानक धनलाभाची शक्यता. स्वछंदपणे वागाल.
  • मिथुन:-
    कौटुंबिक विचारला प्राधान्य द्याल. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. घरगुती कामात लक्ष घालाल. घरातील वातावरण आनंदी असेल. व्यावसायिक लाभ चांगला होईल.
  • कर्क:-
    उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. तुमच्या सुखाच्या कल्पना पूर्ण कराल. कामात अपेक्षित बदल कराल. चिडचिड टाळावी. वायफळ खर्च टाळावा.
  • सिंह:-
    शब्दांना आवर घालावी लागेल. सामाजिक बांधिलकी जपावी. खर्चाचे भान राखावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. काही प्रकारची गुप्तता पाळाल.
  • कन्या:-
    मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. आरोग्यात सुधारणा होईल. चांगली आर्थिक प्राप्ती होईल. नवीन जबाबदारीबरोबरच तुमचा मान देखील वाढेल. कौतुकास पात्र व्हाल.
  • तुळ:-
    औद्योगिक वाढ कराल. कामाचा व्याप वाढेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण करण्याकडे कल राहील. ओळखी वाढतील.
  • वृश्चिक:-
    तुमचे स्थान टिकवून ठेवावे. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. मनाची चंचलता बाजूला सारावी. वडिलधाऱ्यांच्या मताचा प्राधान्याने विचार करावा. निराश होण्याचे कारण नाही.
  • धनु:-
    जोडीदाराच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. काही कामे अडकून पडतील. चुकीच्या संगतीत अडकू नका. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. विसंवाद टाळावा.
  • मकर:-
    पत्नीची प्रगती होईल. जोडीदाराशी होणारे वादविवाद टाळावेत. पोटाची काळजी घ्यावी. नैराश्य बाजूला सारावे. संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे.
  • कुंभ:-
    तब्येतीत सुधारणा होईल. मानसिक शांतता लाभेल. शत्रूंवर विजय मिळविता येईल. हातातील कामे पूर्ण होतील. कामातून आनंद शोधाल.
  • मीन:-
    मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. तुमचे मत इतरांना पटेलच असे नाही. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत. चोरांपासून सावध राहावे.
    आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 06 august 2019 aau