- मेष:-
प्रलोभनांपासून दूर राहावे. फक्त कामावर लक्ष केंद्रित करावे. तब्येतीची हयगय करू नये. उपासनेला बळ मिळेल. वैचारिक बाजू बळकट होईल. - वृषभ:-
आपल्या मनाप्रमाणे दिवस घालवाल. अचानक धनलाभ संभवतो. मुलांच्या बाबतीत हयगय करू नये. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. - मिथुन:-
वैवाहिक सौख्यात भर पडेल. पत्नीचा सुस्वभावीपणा दिसून येईल. अतिअपेक्षा ठेवू नयेत. उच्च राहणीचा विचार कराल. आधिभौतिक गोष्टींचा विचार कराल. - कर्क:-
जोडीदाराच्या मताचा आदर करावा. अपचनाचा त्रास जाणवेल. सांपत्तीक दर्जा सुधारेल. नातेवाईकांची मदत मिळेल. मनात वाढ होईल. - सिंह:-
तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. कामाची प्रशस्ती मिळेल. कामात सातत्य ठेवावे. स्त्रीदाक्षिण्य दाखवाल. धार्मिक ग्रंथांची माहिती करून घ्याल. - कन्या:-
घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. उत्तम गृहसौख्य लाभेल. जुने मित्र भेटतील. - तूळ:-
आशावादी दृष्टिकोन ठेवाल. चांगले साहित्य वाचनात येईल. अभ्यासूपणे सर्व गोष्टी जाणून घ्याल. भावंडांची काळजी लागून राहील. पैज जिंकली जाईल. - वृश्चिक:-
व्यापाऱ्यांना चांगला लाभ मिळेल. हातातील कार्यात जोम येईल. जोडीदाराच्या प्रेमळपणात वाढ होईल. कामात उतावीळपणा कराल. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. - धनु:-
कलेला पोषक वातावरण राहील. हसत-हसत कामे कराल. आपले विचार उत्तम प्रकारे मांडाल. अतिचिकित्सा करू नका. खरेपणाची कास धरावी. - मकर:-
कागदपत्रांची योग्य छाननी करावी. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कोर्ट-काचेरीची कामे होतील. आर्थिक गोष्टी सावधगिरीने कराव्यात. कर्जाची परतफेड केली जातील. - कुंभ:-
मित्रपरिवार वाढेल. नवीन ओळखी होतील. समोर आलेल्या नवीन संधीचा लाभ घ्यावा. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. प्रवासाची आवड पूर्ण कराल. - मीन:-
बौद्धिक चातुर्य दाखवण्याची संधी मिळेल. पुढील गोष्टींचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. पदोन्नतीच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे. व्यावसायिक चिकाटी सोडू नका. घरातील स्त्रीवर्गाची उत्तम साथ लाभेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०७ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
![आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०७ जानेवारी २०२०](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2019/12/Astro.jpg?w=1024)
First published on: 07-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 07 january 2020 aau