- मेष:-
प्रलोभनांपासून दूर राहावे. फक्त कामावर लक्ष केंद्रित करावे. तब्येतीची हयगय करू नये. उपासनेला बळ मिळेल. वैचारिक बाजू बळकट होईल. - वृषभ:-
आपल्या मनाप्रमाणे दिवस घालवाल. अचानक धनलाभ संभवतो. मुलांच्या बाबतीत हयगय करू नये. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. - मिथुन:-
वैवाहिक सौख्यात भर पडेल. पत्नीचा सुस्वभावीपणा दिसून येईल. अतिअपेक्षा ठेवू नयेत. उच्च राहणीचा विचार कराल. आधिभौतिक गोष्टींचा विचार कराल. - कर्क:-
जोडीदाराच्या मताचा आदर करावा. अपचनाचा त्रास जाणवेल. सांपत्तीक दर्जा सुधारेल. नातेवाईकांची मदत मिळेल. मनात वाढ होईल. - सिंह:-
तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. कामाची प्रशस्ती मिळेल. कामात सातत्य ठेवावे. स्त्रीदाक्षिण्य दाखवाल. धार्मिक ग्रंथांची माहिती करून घ्याल. - कन्या:-
घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. उत्तम गृहसौख्य लाभेल. जुने मित्र भेटतील. - तूळ:-
आशावादी दृष्टिकोन ठेवाल. चांगले साहित्य वाचनात येईल. अभ्यासूपणे सर्व गोष्टी जाणून घ्याल. भावंडांची काळजी लागून राहील. पैज जिंकली जाईल. - वृश्चिक:-
व्यापाऱ्यांना चांगला लाभ मिळेल. हातातील कार्यात जोम येईल. जोडीदाराच्या प्रेमळपणात वाढ होईल. कामात उतावीळपणा कराल. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. - धनु:-
कलेला पोषक वातावरण राहील. हसत-हसत कामे कराल. आपले विचार उत्तम प्रकारे मांडाल. अतिचिकित्सा करू नका. खरेपणाची कास धरावी. - मकर:-
कागदपत्रांची योग्य छाननी करावी. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कोर्ट-काचेरीची कामे होतील. आर्थिक गोष्टी सावधगिरीने कराव्यात. कर्जाची परतफेड केली जातील. - कुंभ:-
मित्रपरिवार वाढेल. नवीन ओळखी होतील. समोर आलेल्या नवीन संधीचा लाभ घ्यावा. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. प्रवासाची आवड पूर्ण कराल. - मीन:-
बौद्धिक चातुर्य दाखवण्याची संधी मिळेल. पुढील गोष्टींचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. पदोन्नतीच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे. व्यावसायिक चिकाटी सोडू नका. घरातील स्त्रीवर्गाची उत्तम साथ लाभेल.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०७ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 07-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 07 january 2020 aau
Show comments