- मेष:-
आपली काहीशी चिडचिड होऊ शकते. एकमेकांची बाजू समजून घ्यावी. भागीदारीत वाद आडवे आणू नयेत. भावंडांची चिंता लागून राहील. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल. - वृषभ:-
हातातील कामात अपेक्षित यश मिळेल. मन एकाग्र करण्याचाप्रयत्न करावा. जुन्या कामातून धनलाभ संभवतो. नवीन ओळखी होतील. हित शत्रूंवर मात करता येईल. - मिथुन:-
मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. प्रेमात गैरसमजाला मध्ये आणू नका. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी झटाल. आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक शांतता लाभेल. - कर्क:-
घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. काही वेळेस माघार घेणे योग्य ठरेल. पोटाचे विकार संभवतात. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. - सिंह:-
कामाच्या ठिकाणी मानाची जागा पटकवाल. हातातील अधिकार वापरता येतील. कामाचा जोम वाढेल. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. उत्तम गृहसौख्य लाभेल. - कन्या:-
बोलतांना इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. अनावश्यक खर्च टाळावा. कसलीही खरेदी करतांना मागचा पुढचा विचार करावा. योग्य पथ्ये पाळावीत. उगाच वादात अडकू नये. - तूळ:-
आत्मविश्वासाने कमव हाती घ्याल. फार हट्टीपणा करू नये. शारीरिक उष्णता वाढू शकते. कामात किरकोळ अडचणी येऊ शकतात. कामे जोमाने पार पडतील. - वृश्चिक:-
संयम बाळगावा लागेल. घाईघाईने कोणतेही काम करू नका. पारंपरिक कामाकडे अधिक वेळ द्यावा लागेल. कुटुंबात मंगलकार्य होईल. धार्मिक स्थळी मदत कराल. - धनु:-
कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. आवडते वाद्य वाजवायला मिळेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवासात काळजी घ्यावी. खर्चाकडे लक्ष ठेवा. - मकर:-
कष्टाला पर्याय नाही. प्रयत्नात कसूर करू नका. जुन्या गोष्टी मनातून काढून टाकाव्यात. ध्यानधारणा करण्यात वेळ घालवावा. क्षणिक आनंदात रमून जाल. - कुंभ:-
जवळचा प्रवास मजेत होईल. सरकारी मदत घेता येईल. योग्य संधीची वाट पाहावी लागेल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक समाधान लाभेल. - मीन:-
चंचलतेवर मात करावी. तुमची कला इतरांसमोर सादर करता येईल. घरातील वातावरण आनंदी असेल. नवीन आव्हानांचा स्वीकार करावा. अपवादांकडे दुर्लक्ष करावे.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, मंगळवार, १० डिसेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 10-12-2019 at 00:08 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 10 december 2019 aau