- मेष:-
वडिलांची मदत घ्यावी. व्यावसायिक प्रगतीकडे लक्ष ठेवावे. आत्मविश्वास बाळगून पुढे जाल. तुमची लोकप्रियता वाढेल. कर्तबगारीला चांगला वाव आहे. - वृषभ:-
भावंडाचे उत्तम सहकार्य मिळेल. आनंदाने काम करण्यावर भर द्याल. प्रवासाचा योग येईल. हातून एखादे सत्कार्य घडेल. कामाचे कौतुक केले जाईल. - मिथुन:-
अचानक धनलाभ संभवतो. नसते विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करावा. रेस, जुगार यातून फायदा संभवतो. चुकीच्या मार्गाचा अवलंब टाळावा. - कर्क:-
महिलांचा घरात पगडा राहील. भागीदारीत समाधानी असाल. प्रवास मजेत होईल. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. - सिंह:-
छुप्या शत्रूंवर बारीक लक्ष ठेवा. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नये. - कन्या:-
व्यापारीवर्गाला चांगला फायदा संभवतो. मनाजोगी खरेदी करता येईल. नसत्या वादात पडू नका. कागदपत्रे जपून ठेवावीत. छंद जोपासाल. - तूळ:-
उघडपणे बोलणे टाळावे. घरगुती खरेदी कराल. चांगले वाहन सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. स्वच्छतेची कामे कराल. - वृश्चिक:-
भावंडाना मदत कराल. मित्रांचे सहकार्य मिळेल. दिवस प्रवासात जाईल. कामाला योग्य गती येईल. कामातील बदल योग्य ठरेल. - धनु:-
जुन्या कामात अडकून पडाल. अचानक धनलाभाची शक्यता. काटकसर करावी लागेल. वारसा हक्काची कामे निघतील. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. - मकर:-
जोडीदाराशी सल्लामसलत कराल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. हातातील कामात यश येईल. किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. - कुंभ:-
उगाचच चिंता करत बसू नये. धार्मिक कामात सहभाग नोंदवा. वादात गुंतून पडू नका. हलक्या कानाच्या लोकांकडे दुर्लक्ष करावे. झोपेचा त्रास जाणवेल. - मीन:-
मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल. मुलांच्या आनंदात दिवस मजेत जाईल. कामातून समाधान लाभेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, मंगळवार, १० सप्टेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 10-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 10 september 2019 aau