- मेष:-
मनाची संवेदनशीलता दाखवाल. पैजेची हौस पूर्ण कराल. मुलांच्या आनंदात रमून जाल. दिवस आनंदात जाईल. चौकसपणे सर्व गोष्टी जाणून घ्याल. - वृषभ:-
घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. उत्तम गृहसौख्य लाभेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मानसिक शांतता महत्त्वाची आहे. घरात प्रेमळ वातावरण राहील. - मिथुन:-
जोडीदाराची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. फार मतवैचित्र दाखवायला जाऊ नका. वादाचे मुद्दे उकरून काढू नका. जवळचा प्रवास करावा लागेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. - कर्क:-
अपचनाचा त्रास जाणवू शकतो. मनातील नैराश्य दूर सारावे. जोडीदाराशी मतभेद संभवतात. आरोग्याबाबत सतर्क राहावे. कोणत्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. - सिंह:-
इतरांच्या मनात आदर निर्माण कराल. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. वातविकाराचा त्रास संभवतो. मुलांच्या धाडसात वाढ होईल. जोडीदाराचा सुशिक्षितपणा दिसून येईल. - कन्या:-
कामातील उत्साह वाढीस लागेल. घरातील गोष्टीत अधिक लक्ष घालावे. मानसिक चिंता बाजूला साराव्यात. प्रवासात सावधानता बाळगावी. नातेवाईकांशी सलोखा निर्माण करावा. - तूळ:-
कामाचा पुरेपूर आनंद घ्याल. हातातील अधिकार समजून घेऊन वागावे. हितशत्रूंवर विजय मिळवता येईल. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. मनातील इच्छेला महत्व द्याल. - वृश्चिक:-
खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. चोरांपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी. मत्सराला बळी पडू नका. कौटुंबिक समाधान राखण्याचा प्रयत्न करावा. - धनु:-
बौद्धिक बाजू सुधारेल. धार्मिक कामात हातभार लावाल. सेवेचे महत्व लक्षात घ्याल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. - मकर:-
अडथळ्यातून मार्ग निघेल. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. काही गोष्टींना वेळ द्यावा लागेल. घरगुती बदल सकारात्मकतेने स्वीकारावेत. मनातून जुन्या गोष्टी काढून टाकाव्यात. - कुंभ:-
वैचारिक स्थिरता जपावी. आपली संगत तपासून पहावी. मैत्रीत मतभेद आड आणू नका. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. मानसिक चंचलता राहील. - मीन:-
प्रत्येक गोष्टीत आनंद शोधाल. कला जोपासायला वेळ काढावा. नवीन गोष्टींची ओढ वाढेल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. आपली हौस पूर्ण करता येईल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 11-02-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 11 february 2020 aau