- मेष:-
चोरांपासून सावध राहावे. विरोधकांचे दडपण राहील. कामाचा ताण जाणवेल. मनाचे औदार्य दाखवाल. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल. - वृषभ:-
वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. वादात अडकू नये. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. अचानक धनलाभाची शक्यता. प्रकृतीची काळजी घ्यावी. - मिथुन:-
घरगुती जबाबदारी समर्थपणे पेलाल. खर्चाकडे लक्ष द्यावे. हातातील अधिकार वापराल. तुमचा मान वाढेल. कामाचा जोम वाढेल. - कर्क:-
भावनेला आवर घालावी लागेल. काही कामे वेळ काढतील. कामाची जबाबदारी वाढू शकते. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. अडथळ्यातून मार्ग काढाल. - सिंह:-
शारीरिक कष्ट वाढू शकतात. कार्यप्रविणता दाखवाल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. भावनेच्या भरात बोलतांना सारासार विचार करूनच बोलावे. डोकेदुखी सारखे त्रास जाणवू शकतात. - कन्या:-
सामुदायिक वादात अडकू नका. प्रवासात काळजी घ्यावी. व्यावसायिक लाभाचा अधिक विचार कराल. मोठ्या लोकांच्या संगतीत रमाल. कोर्टाची कामे निघतील. - तुळ:-
कामाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करावा. अनुदानाची कामे होतील. कमिशनमधून फायदा संभवतो. कलागुणांना चांगला वाव मिळेल. सरकारी कामात विशेष लक्ष घालावे. - वृश्चिक:-
औद्योगिकदृष्ट्या सतर्कता ठेवावी. वरिष्ठांशी बोलतांना नरमाई ठेवावी. गुरुकृपेचा लाभ होईल. मनाजोगी संगती लाभेल. वडिलधाऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. - धनु:-
मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. प्रवासात सावधानता बाळगावी. शांतपणे विचार करून ते कृतीत आणाल. आवडत्या गोष्टी कराल. दुचाकी वाहन चालवितांना सतर्क राहावे. - मकर:-
एकाच गोष्टीवर अडून राहू नका. मानसिक शांतता राखावी. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. कौटुंबिक सौख्याचा विचार करावा. खर्चाचा विचार करावा. - कुंभ:-
पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोर्टाची कामे पुढे ढकलावीत. जोडीदाराचे म्हणणे समजून घ्यावे. कामे मनासारखी पार पडल्याने खूश असाल. चिडचिड करू नये. - मीन:-
गैरसमजुतीतून वाद निर्माण होवू शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याची काळजी घ्यावी. अति भावनिक होणे टाळावे. आवडते छंद जोपासावेत.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 13-08-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 13 august 2019 aau