मेष

अनेक चांगल्या घटनांचा संकेत आजच्या दिवशी येईल. स्त्रियांसाठी उत्साहाचा दिवस आहे. परान्न वर्ज्य करावे. विद्यार्थिनींनी खेळताना काळजी घ्यावी. ओम श्री आदि गुरवे नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

आज राशीतील चंद्राचे भ्रमण आणि पौर्णिमा या दोन योगांमुळे वृषभ राशीच्या लोकांना अनेक सुसंधी येतील. उत्साहात दिवस जाईल. मुलांच्या प्रगतीसाठी कारक दिवस असेल. गणपतीचे आणि दत्त महाराजांचे दर्शन घेणे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होण्यासाठी उत्तम दिवस. परंतु मोठ्या निर्णयांसाठी आजचा दिवस तितकासा महत्त्वाचा नाही. ओम श्री आदि गुरवे नमः मंत्राचा जप करणे
आजचा रंग – गुलाबी

कर्क

कर्क राशीच्या लोकांना आजची पौर्णिमा उत्साही असणार आहे. आज कुटुंबात, नोकरी व्यवसायांमध्ये उत्तम सहकार्य लाभेल. तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडेल. दत्त महाराजांच्या आणि गणपती मंदिरात फुले अर्पण करावी.
आजचा रंग – लाल

सिंह

आज घरातील लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. त्यांची चौकशी करावी. गणपती मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तूचे अर्पण करावे.
आजचा रंग – पिवळा

कन्या

आजची दत्त पौर्णिमा कन्या राशीसाठी पुढील अनेक दिवसांचे शुभ संकेत देणारे ठरणार आहे. त्यामुळे सुसुत्रबद्ध नियोजन करावे. गणपती मंदिरामध्ये अभिषेक करावा.
आजचा रंग – लाल

तुळ

साडेसातीमध्ये शनी भ्रम निर्माण करतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला संधीला पडताळून पाहूनच निर्णय घ्यावेत. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

आज मंगलमय दिवस आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच एखादी जबाबादारी स्वीकारावी लागेल. कायदेशीर कामे मार्गी लागू शकतात. वरिष्ठांशी शांत चित्ताने बोलावे. ओम गं गणपतेय नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – तांबडा

धनु

संमिश्र प्रतिसादाचा दिवस. मोठ्या योजना किंवा घरांतील छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या शांत चित्ताने पार पाडाव्यात. गणपती मंदिरामध्ये गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा
आजचा रंग – पिवळा

मकर

आजची पौर्णिमा अनेक जुन्या योजना पूर्णत्वास आणणारी ठरू शकते. त्यामुळे अशा योजनांचा पाठपुरावा करून दिवसाची सुरुवात करावी. गणपती व दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये फुले अर्पण करून दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – गुलाबी

कुंभ

दत्त जयंतीची पौर्णिमा यशदायक असणार आहे. अधिकार पदांसाठी प्रयत्न केल्यास पुढील काही दिवसात फलप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांसाठी योग्य दिवस आहे. दत्त महाराजांची उपासना करणे.
आजचा रंग – गुलाबी

मीन

आज दत्त पौर्णिमा. आजपासून पुढील काही दिवस मीन राशीस महत्त्वाचे असणार आहेत. त्याची सुरुवात आजच्या दिवसापासून होत आहे. त्याचा पूर्ण फायदा घ्यावा. दत्त महाराजांची उपासना करणे.
आजचा रंग – राखाडी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader