मेष

गणपती अथर्व शीर्षाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक आवक उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल.
आजचा रंग –पांढरा

वृषभ

गणपती मंदिरात नेवैद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, जमिनीचे खरेदीविक्री करणारे व्यावसायिक यांनी विशेष दक्षता बाळगावी. कायदेशीर प्रश्न सोडवू शकाल.
आजचा रंग –पांढरा

मिथुन

ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल.
आजचा रंग –ऑफ व्हाइट

कर्क

गणपती मंदिरात गुलाबाचे फुल अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल. सर्व क्षेत्रातील अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहेत. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिकांचे नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –फिक्कट पिवळा

सिंह

आज गणेश स्तुती म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना लाभदायक ग्रहमान आहेत. प्रतिष्ठेचे योग संभवतात. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल.
आजचा रंग -नारंगी

कन्या

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे, ओटी भरावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. सर्वांशी सलोखा राखावा. मोठी आर्थिक उलाढाल करू नये.
आजचा रंग –निळा

तुळ

महादेवाच्या मंदिरात एक मुठ तांदुळ अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. व्यावसायिकांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक स्थिरतेच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. गुंतवणुकीस अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग -नारंगी

वृश्चिक

ॐ श्री क्लींम नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे आणि वाताशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. मोठया आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –केशरी

धनु

कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेवू शकाल. नवीन योजना राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग –राखाडी

मकर

गणपती अष्टक म्हणावे, गणपती स्तोत्राचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतिची काळजी सतावेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यावसायिक , फर्निचर, गृह उपयोगी वस्तु आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.
आजचा रंग –पांढरा

कुंभ

महादेवाचे स्मरण करून ॐ या बीज मंत्राचे उच्चारण करावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा जाणवेल परंतु स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल. कामामध्ये ताणतणाव जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरिक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग-मोरपंखी

मीन

आज दिवसभर अथर्व शीर्ष ऐकावे किंवा पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. नवीन योजना राबवू शकाल. व्यावसायिक हितसंबंध दृढ करू शकाल. जुनी येणी वसूल करू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना उत्तम आर्थिक स्थितीचा दिवस आहे.
आजचा रंग –पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader