- मेष:-
उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरातील कामे वेळेत पूर्ण होतील. दिवस हसत-खेळत घालवाल. सर्वांशी मनमिळाऊपणे वागाल. कामात प्रगतीला चांगला वाव मिळेल. - वृषभ:-
जोडीदाराकडून मिळणारे सौख्य वाढीस लागेल. दूरच्या प्रवासाचा योग्य येईल. भावंडे कामानिमित्त दूर गावी जातील. नसत्या काळज्या करत बसू नये. निर्णयात घाई करू नका. - मिथुन:-
स्वकष्टावर अधिक लक्ष द्यावे. मनातील इच्छा जागृत ठेवाल. आर्थिक बाजू बळकट कराल. व्यावसायिक लाभावर लक्ष ठेवावे. मित्रांच्या संगतीत दिवस मजेत जाईल. - कर्क:-
धंद्यात मनाचे स्थान मिळविण्याचा प्रयत्न कराल. सामाजिक दर्जा सुधारेल. व्यापारीवर्ग खुश राहील. दिवसभर कामात व्यग्र राहाल. कामाची गती वाढेल. - सिंह:-
तुमची ठाम बाजू सर्वांच्या लक्षात येईल. काही निर्णय धाडसाने घ्याल. बोलतांना भडक शब्द वापरू नका. खर्चाचे गणित नव्याने मांडावे. जेवणाच्या वेळा चुकवू नका. - कन्या:-
काही गोष्टी सुरळीत होण्यासाठी पुरेसा वेळ द्या. मन एकाग्र करावे. स्वतः चाच गोंधळ उडवून घेऊ नये. केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. काही कामे तुमचा वेळ वाया घालवू शकतात. - तूळ:-
प्रेमसौख्यात भर पडेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. अंगिभूत कलेला जोपासावे. सामुदायिक वादात लक्ष घालू नका. नैराश्य बाजूला सारावे. - वृश्चिक:-
घरी मोठ्या लोकांची उठबस होईल. मित्रांशी होणारे गैरसमज दूर करावेत. जुनी कामे रेंगाळत ठेवू नयेत. व्यवसायातून चांगला नफा मिळेल. उगाच शंका काढत बसू नका. - धनु:-
मुलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. स्वतः च्याच मतावर अडून राहू नये. एककल्ली विचार न केलेलेच बरे. बदलांकडे सकारात्मकतेने पाहावे. नवीन मित्र जोडले जातील. - मकर:-
कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. चिरचिरेपणा सोडून द्यावा. जुन्या गोष्टी उगाळत बसू नयेत. कामात प्रगती करता येईल. वडीलधाऱ्यांची नाराजी दूर करावी. - कुंभ:-
किरकोळ जखमांकडे वेळीच लक्ष द्यावे. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. भावंडाना आर्थिक मदत करावी लागेल. पत्नीशी अनबन होऊ शकते. एकलकोंडेपणा दूर करण्याचा प्रयत्न करावा. - मीन:-
मुलांवरील खर्च वाढू शकतो. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. कौटुंबिक वातावरणात खेळकर असेल. हातातील कामात यश येईल. स्थावरची कामे मार्गी लागतील.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, मंगळवार, १५ ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 15-10-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 15 october 2019 aau