- मेष:-
उत्तम वाहन सौख्य लाभेल. सर्वांशी मनमिळाऊपणे वागाल. घराची कामे करण्यात दिवस जाईल. तुमची चांगली छाप पडेल. काही ठिकाणी थोडा अधिक प्रयत्न करावा लागेल. - वृषभ:-
वेगवेगळी कामे हाती घ्याल. विविध मार्गांनी आनंद उपभोगाल. दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. महिलांच्या हातात पैसा खुळखुळेल. कामातून सुट्टी घेण्याचा विचार कराल. - मिथुन:-
योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल. जवळच्या मित्रांमध्ये रमाल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाचे प्रशस्तीपत्र मिळेल. - कर्क:-
तिखट पदार्थ चाखाल. रागावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्याल. कोणताही भडक शब्द वापरू नये. कामाची दगदग जाणवेल. - सिंह:-
मानीपणा दर्शवाल. वागण्यातून आत्मविश्वास दिसून येईल. समाजात दर्जा निर्माण कराल. स्वत:चे स्वत्व राखण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. - कन्या:-
तुमच्यातील राजकारणी गुण दिसून येईल. बौद्धिक चुणूक दाखवाल. स्मरणशक्तीचा योग्य वापर कराल. आपले मत उत्कृष्टपणे मांडाल. सर्व गोष्टी योग्यरीतीने जाणून घ्याल. - तूळ:-
भावनेच्या भरात सर्व गोष्टी बोलू नका. परदेश गमनाची संधी चालून येईल. स्त्रीवर्गाच्या मुद्यात लक्ष घालू नये. पराक्रमाला चांगला वाव आहे. मित्रांशी वाद घालू नका. - वृश्चिक:-
लहान मुलांमध्ये रमाल. अभ्यासू दृष्टीकोन ठेवाल. लबाड लोकांपासून सावध राहावे. व्यापारीवर्गाला चांगला फायदा संभवतो. मनाजोगी खरेदी कराल. - धनु:-
कारकून वर्गाला लाभाची संधी मिळेल. आपला फायदा काढण्याकडे लक्ष द्यावे. व्यवहार चातुर्य दाखवावे. परिस्थितीचा अंदाज घ्यावा.चिकाटी धरून ठेवावी. - मकर:-
तुमच्या कामाला प्रसिद्धी मिळेल. वाचनाची आवड पूर्ण कराल. सहकुटुंब प्रवास कराल. आपले मत ठामपणे मांडाल. कामात स्फूर्ती मिळेल. - कुंभ:-
मनाविरुद्ध प्रवास करावा लागेल. कामात गतिमानता येईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. पत्नीच्या मताचा विचार कराल. भागीदारीत संयम ठेवावा. - मीन:-
विचार-विनिमयाने मुद्दा जाणून घ्याल. कौटुंबिक गोष्टीत रमून जाल. गोड पदार्थ चाखायला मिळतील. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. मुलांचा आनंद महत्त्वाचा ठरेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, मंगळवार, १७ सप्टेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 17-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 17 september 2019 aau