• मेष:-
    कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. आरोग्यात सुधारणा होईल. कामाचा उरक वाढेल. नवीन अधिकार हातात येतील.
  • वृषभ:-
    जवळचा प्रवास आनंदात होईल. भावंडांचा सहवास लाभेल. बौद्धिक दिमाख दाखवाल. उपासनेत प्रगती करता येईल. कपड्याच्या बाबतीत चोखंदळपणा दाखवाल.
  • मिथुन:-
    आवडते पदार्थ खायला मिळतील. मनाची संवेदनशीलता दर्शवाल. आलेल्या परिस्थितीकडे सकारात्मकतेने पाहाल. कर्तबगारीला चांगला वाव आहे. मनाविरुद्ध प्रवास करावा लागेल.
  • कर्क:-
    दिवस मनाजोगा व्यतीत कराल. पैसे खर्च करतांना पुढचा-मागचा विचार करावा. तुमच्या प्रेमळ स्वभावाचे कौतुक केले जाईल. स्त्रीवर्गाच्या मदतीने कामे पार पडतील. वादात अडकू नका.
  • सिंह:-
    किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. नवीन गुंतवणूक कराल. घराबाहेर वावरतांना सावधगिरीने वागावे. काही कामे वेळ घालवतील.
  • कन्या:-
    मानापमानाचे प्रसंग नजरेआड करावेत. मोठ्या लोकांशी मैत्री कराल. गुंतवणूक करतांना सतर्कता बाळगावी. कामाचा थकवा जाणवेल. कामाचा ताण वाढल्याने थकवा जाणवेल.
  • तूळ:-
    क्षणिक सौख्याचा आनंद घ्याल. चैनीत दिवस घालवाल. कर्ज प्रकरणे योग्यरीतीने हाताळावीत. काही कामात खंड पडू शकतो. मनाविरुद्ध काही कामे करावी लागतील.
  • वृश्चिक:-
    अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. ओळखीचा फायदा होवू शकतो. स्त्रीसमुहात वावराल. लहान मुलांबरोबर खेळ खेळाल. घरगुती कार्यक्रमात सहभाग नोंदवाल.
  • धनु:-
    कलेतून फायदा संभवतो. आर्थिकदृष्ट्या दिवस मनाजोगा जाईल. वरिष्ठांना नाराज करू नका. भावनांच्या गुंत्यात अडकू नका. कफविकाराचा त्रास जाणवेल.
  • मकर:-
    वैवाहिक सौख्यात रममाण व्हाल. भागीदारीत चांगला फायदा संभवतो. मैत्रीतून जवळीक वाढेल. तुमची लोकप्रियता वाढेल. सामुदाईक भांडणात अडकू नका.
  • कुंभ:-
    कामाचा आनंद घ्याल. नातेवाईकांच्या सहवासात दिवस मजेत जाईल. परिस्थितीकडे सकारात्मकतेने पाहाल. मानसिक शांतता लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.
  • मीन:-
    आवडत्या छंदात रममाण व्हाल. करमणुकीत दिवस व्यतीत कराल. तारतम्य बुद्धीचा वापर कराल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. सखोल चिंतन कराल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 24 september 2019 aau