- मेष:-
चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. नवीन ओळखी वाढतील. गप्पांच्या मैफलीत रमून जाल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. - वृषभ:-
कामात स्त्री वर्गाची मदत लाभेल. कमिशनमधून फायदा संभवतो. स्थावरच्या कामात लाभ होईल. जुनी येणी वसूल होतील. कलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल. - मिथुन:-
चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. तुमच्या कलेला चांगली प्रसिद्धी मिळेल. व्यावसायिक वातावरण चांगले राहील. मनाजोगी खरेदी कराल. - कर्क:-
मानसिक चंचलता जाणवेल. कल्पना शक्तीला वाव देता येईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वाचनाची आवड जोपासाल. परोपकारी दृष्टीकोन ठेवाल. - सिंह:-
जुन्या कामातून लाभ संभवतो. रेस-सत्ता यांतून लाभाची शक्यता. काही कामे विनासायास पार पडतील. कामाचा आनंद घेता येईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवा. - कन्या:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील लोकांचा सहवास वाढेल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. कामाचे योग्य नियोजन करावे. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष्य घाला. - तूळ:-
हातातील अधिकाराची योग्य जाणीव ठेवा. क्वचित प्रसंगी टीका होऊ शकते. स्व-मतावर आग्रही राहाल. कानाचे त्रास संभवतात. भावंडांची बाजू जाणून घ्यावी. - वृश्चिक:-
बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. दिवस खटपटीत जाईल. लहरीपणाने वागू नका. दूर दृष्टीकोन ठेवावा लागेल. कष्टाला घाबरू नका. - धनु:-
स्व-बळावर कामे हाती घ्याल. आत्मविश्वास वाढीस लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. स्वातंत्र्यप्रियता दर्शवाल. - मकर:-
सामुदायिक वादात अडकू नका. गैरसमजुती मुळे त्रास संभवतो. डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी. उधार-उसनवारीचे व्यवहार सतर्कतेने करावेत. काही कामे खिळून पडू शकतात. - कुंभ:-
कामाचा ताण जाणवेल. मुलांची चिंता लागून राहील. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल. मनातील प्रबळ इच्छेला महत्व द्यावे. प्रयत्नात कसूर करू नका. - मीन:-
काही अनपेक्षित बदल घडू शकतात. वडिलांचे मतविरोधी वाटू शकते. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. हटवादीपणा करू नये. दर्जा टिकवण्याची धडपड कराल.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 25-02-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 25 february 2020 aau