- मेष:-
महत्वाच्या गोष्टी विसरु नयेत. प्रेमात अधिकारवाणी आणू नये. बैठे खेळ खेळाल. प्रवासात काळजी घ्यावी. महत्वाच्या गोष्टींची नोंद घ्यावी. - वृषभ:-
उगाचच त्रागा करू नका. घरगुती कामात लक्ष घालाल. मानसिक शांतता जपावी. घरगुती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करावा. चुकीचे संदर्भ टाळावेत. - मिथुन:-
उत्साहाच्या भरात कामे हाती घ्याल. अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. विचार भरकटू देवू नका. एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करावा. - कर्क:-
गुंतवणुकीबाबत सावधानता बाळगावी. दृष्टीकोन बदलून पाहावा. काटकसरीकडे लक्ष द्यावे. तामसी पदार्थ खाणे टाळावेत. अतिविचारांच्या नादात भावनेच्या आहारी जाणे टाळावे. - सिंह:-
गप्पांमधून जवळीक वाढेल. कामाची दग-दग राहील. अडथळयातून मार्ग काढाल. काही गोष्टींमध्ये तडजोड करावी. भावनेला आवर घालावी लागेल. - कन्या:-
मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. आवाक्याबाहेरील खर्च टाळावा. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. काही बाबतीत संयम राखून वादाचे प्रसंग टाळावेत. झोपेची तक्रार मिटेल. - तुळ:-
उत्तम व्यवसायिक लाभ होईल. मनातील आकांक्षांना मूर्त रुप द्याल. मान-सन्मानास पात्र व्हाल. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. - वृश्चिक:-
काही कामांना अधिक कष्ट घ्यावे लागतील. मोठ्या लोकांची संगत लाभेल. अपेक्षित धन प्राप्ती होईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. - धनु:-
वयोवृद्धांचा मान राखावा. आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे. आपला मान जपावा. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. कामाचा ताण जाणवेल. - मकर:-
जोडीदाराविषयी गैरसमज करु नयेत. क्षुल्लक कारणांवरून वाद घालू नका. कामात एकाग्रता ठेवावी. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. चुकीच्या संगतीत अडकू नका. - कुंभ:-
आलेल्या संधीचा फायदा घ्यावा. तुमचा जनसंपर्क वाढेल. जोडीदाराला आर्थिक लाभ होतील. जोडीदाराशी होणारे मतभेद टाळावेत. एकमेकांची बाजू समजून घ्यावी. - मीन:-
क्षणिक मोहाला बळी पडू नका. विरोधकांना जिंकता येईल. हातातील कामे पूर्ण होतील. कामाचा आनंद मिळेल. चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नये.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, मंगळवार, २७ ऑगस्ट २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 27-08-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 27 august 2019 aau