मेष
कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे थोड्या निर्धाराने आजचा दिवस पार पाडावे. आज दिवसभर अथर्वशीर्षाचे पाठ करावेत.
आजचा रंग – हिरवा
वृषभ
नवीन प्रोजेक्ट सुरु करण्यास, एखादे नवीन दुकान सुरू करण्यास योग्य दिवस आहे. नोकरदार, व्यवसाय, विद्यार्थी, गृहिणी सर्वांनाच आजच्या दिवशी महत्त्वाचे निर्णय घ्यावेत, संकल्प सोडावेत. महादेवाचे स्मरण करुन ओम या बीज मंत्राचे उच्चारण करावे.
आजचा रंग- निळा
मिथुन
महत्त्वाचे निर्णय घेऊ नये, वृश्चिकेचा चंद्र फारसा यशदायी नसणार, आजचा दिवस संयमाने घालवावा. महिलांनी चिडचिड होऊ देऊ नये. वरिष्ठांशी सुसंवाद ठेवावा. त्यासाठी थोडे प्रयत्नशील राहावे. गणपती अष्टक म्हणावे, गणपती स्तोत्राचा पाठ करावा.
आजचा रंग – हिरवा
कर्क
सुसंधी घेऊन येणारा दिवस. अनेक दिवसांच्या मनात योजलेल्या गोष्टी पूर्ण होण्याच्या दृष्टीने खूप सुंदर योग आहेत. कुटुंब मित्र परिवार, व्यवसाय, नोकरी सहकारी, कर्मचारी सर्वांचे सहकार्य लाभेल, असे वातावरण खूप कालखंडानंतर येते. त्यामुळे कर्केच्या व्यक्तिंनी पूर्ण नियोजन करावे. कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – हिरवा
सिंह
वृश्चिकेतील चंद्राचे भ्रमण नवीन जबाबदाऱ्या पार पाडण्यास बळ देईल, त्याच बरोबर कन्येचा गुरू योग परिचय, नवीन संधी उपलब्ध करुन देईल. पूर्ण क्षमतेने कामास लागा, आर्थिक सामाजिक प्रगती चांगली होईल. ओम श्री क्लीम नमः चा जप करावा.
आजचा रंग – पिवळा
कन्या
आर्थिक नियोजनासाठी, बढती, नवीन वस्तू खरेदीसाठी उत्तम दिवस. नियोजित कामे करण्यास उत्तम दिवस. महादेवाच्या मंदिरात एकमूठ तांदूळ अर्पण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – निळा
तुळ
वृश्चिक राशीत चंद्राचे भ्रमण असणार आहे. अनेक जबाबदाऱ्या पार पाडाल. योग्य सहकार्य लाभेल. साडेसातीचा प्रभाव जाणवणार नाही. अनेक गोष्टी सुखकर होतील. व्यावसायिक संबंध सुधारतील. कुलस्वामिनीची ओटी भरणे.
आजचा रंग – हिरवा
वृश्चिक
आज वृश्चिक राशीचे चंद्राचे भ्रमण शुभकारक आहे. स्थावर मालमत्तेचे विषय मार्गी लागतील. नवीन वास्तूच्या दृष्टीने जरुर प्रयत्न करा. कामाचा ताण कमी होणारा दिवस. आज गणेश स्तुती म्हणणे.
आजचा रंग – पिवळा
धनु
स्थावर मालमत्तेचे प्रश्न असल्यास निर्णय पूर्ण सल्ल्याने घ्यावे. कायदेशीर बाजूचा विचार करावा. घाईघाईत निर्णय घेऊ नये. गणपती मंदिरात गुलाबाचे फूल अर्पण करावे.
आजचा रंग – पिवळा
मकर
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असणार आहे. प्रकृतीची काळजी घेणे. महिलांनी पोटाचे आणि उष्णतेचे आजार जपणे. दुर्लक्ष करु नये. व्यावसायिकांना प्रवासाचे योग आहेत, योग्य संधी प्राप्त करण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च होईल. दगदग वाढेल. ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा
कुंभ
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असणार आहे. स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटतील, नवीन वाहनांचा योग, घरातील सदस्यांशी जुळवून घेता येईल. गणपती मंदिरात नेवैद्य दाखवावा.
आजचा रंग – गुलाबी
मीन
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असणार आहे. व्यावसायिक प्रगतीसाठी उत्तम दिवस. नवीन कामांची योजना अंमलात आणू शकाल. नोकरीसाठी प्रयत्न करावेत, विवाह इच्छुकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागू शकतात. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करावेत.
आजचा रंग – निळा