1. मेष:-
    व्यवसायातून चांगली प्राप्ती होईल. बढतीची शक्यता दिसून येईल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. तुमची समाजप्रियता वाढेल.
  2. वृषभ:-
    सांपत्तिक स्थिती सुधारेल. अनपेक्षित लाभ होतील. कलेला चांगली प्रसिद्धी मिळेल. प्रशस्तिपत्रकास पात्र व्हाल. इतरांची मने जिंकून घेता येतील.
  3. मिथुन:-
    सर्वांशी सहृदयतेने वागाल. कलेला पोषक वातावरण लाभेल. चांगले साहित्य वाचनात येईल. परोपकारीवृत्तीने वागाल. लेखकांना चांगली प्रतिभा लाभेल.
  4. कर्क:-
    काही कामे कमी श्रमात पार पडतील. सासुरवाडीची मदत मिळेल. वारसाहक्काची कामे मार्गी लागतील. रेस, सट्टा यांतून लाभ संभवतो. शेअर्समध्ये गुंतवणूक कराल.
  5. सिंह:-
    पत्नीचा सुस्वभावीपणा दिसून येईल. तुमच्यातील एकोपा वाढेल. वैवाहिक सौख्याला उधाण येईल. प्रलोभनाला बळी पडू नका. भागीदारीत चांगला लाभ होईल.
  6. कन्या:-
    काही इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागेल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. काहीसा आळशीपणा जाणवेल. हाताखालील कामगार चांगले मिळतील.
  7. तूळ:-
    तुमच्यातील गुण प्रकट होतील. व्यवहाराला विसरू नका. चांगले आत्मिक समाधान लाभेल. मनाजोगा छंद जोपासता येईल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल.
  8. वृश्चिक:-
    घराची टापटीप ठेवाल. प्रेमभावनेत वाढ होईल. मित्र-परिवारात वाढ होईल. प्रेमाचे योग्य मूल्यमापन कराल. नवीन कल्पना रूजवाल.
  9. धनू:-
    हातातील कलेत रममाण व्हाल. इतरांचे कौतुक कराल. प्रवासाची हौस भागवाल. नव्या स्फूर्तीने बघाल. मदतीचा हात पुढे कराल.
  10. मकर:-
    तुमची उत्कृष्ट छाप पडेल. आवाजात गोडवा ठेवाल. कमतरता भरून निघेल. गोड पदार्थ खायला मिळतील. महिला अलंकार खरेदी करतील.
  11. कुंभ:-
    आवडी-निवडीवर भर द्याल. महिला नटण्याची हौस पूर्ण करतील. प्रत्येक गोष्टीत रस घ्याल. चांगला दृष्टीकोन रूजवाल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
  12. मीन:-
    क्षुल्लक अडचणीतून मार्ग काढावा. मानपमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी मनात नसतांना सुद्धा कराव्या लागतील.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader