- मेष:-
दिवस आळसात उगवेल. स्त्री समूहात वावराल. व्यवसायात चांगला लाभ होईल. मुलांच्या आनंदाने भारावून जाल. सुखासक्तपणा जाणवेल. - वृषभ:-
तुमचे मत अधिक ग्राह्य धरले जाईल. सामाजिक वजन वाढेल. घरातील कामात अधिक वेळ जाईल. उत्तम गृहसौख्य राहील. घरातील वातावरण आनंदी असेल. - मिथुन:-
धार्मिक गोष्टींची आवड दर्शवाल. सेवेचे महत्व लक्षात घ्याल. तुमच्या कामाची वाखाणणी केली जाईल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कामात एकसूत्रता ठेवावी. - कर्क:-
मानसिक चिंता सतावेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. काही गोष्टी अकस्मात घडू शकतात. अचानक धनलाभ संभवतो. आरोग्यात फरक दिसून येईल. - सिंह:-
उत्तम वैवाहिक सौख्याचा दिवस. दिवस शांततेत जाईल. भागीदारीत उत्तम लाभ होईल. घरगुती प्रश्नात लक्ष घालावे. कामात सुस्तपणा आड येऊ शकतो. - कन्या:-
लहान-सहान गोष्टी नजरेआड कराव्यात. परिस्थितीला नावे ठेवू नका. उगाच चिडचिड करू नका. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल. हातातील अधिकार वापरावे लागतील. - तूळ:-
परिस्थितीचे योग्य आकलन कराल. कामात चलाखी दाखवाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. स्वच्छंदीपणे वागाल. कलेचा मनमुराद आनंद घ्याल. - वृश्चिक:-
उष्णतेचे त्रास वाढू शकतात. चांगले गृहसौख्य राहील. कौटुंबिक जबाबदारी घ्यावी लागेल. तुमच्यातील चिकाटी वाढवावी. घाईघाईने कोणत्याही कामात हात घालू नका. - धनु:-
भावंडांचे सौख्य वाढेल. एकमेकांतील एकोपा वाढीस लागेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मानसिक चंचलता जाणवेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. - मकर:-
तुमचा आनंद द्विगुणित होईल. दिवस मानाजोगा व्यतीत कराल. आवडते पदार्थ चाखाल. चांगला आर्थिक लाभ होईल. हौस भागवण्याची संधी मिळेल. - कुंभ:-
तुमचे कौतुक केले जाईल. बदलांचा स्वीकार करावा. अधिकारात वाढ संभवते. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. - मीन:-
मनाची दोलयमानता जपावी. विचारात वाहून जाऊ नका. मनातील इच्छेला प्राधान्य द्यावे. वरिष्ठांना खुश ठेवावे. सरकारी कामात वेळ लागू शकतो.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, मंगळवार, ३१ डिसेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 31-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 31 december 2019 aau