मेष:-बौद्धिक चलाखी दाखवाल. तत्परतेने कामे कराल. आपल्या भावना उत्तम प्रकारे मांडाल. हसत खेळत कामे कराल. चिकित्सक नजरेने गोष्टी जाणून घ्या.

वृषभ:-जामिनकीचे व्यवहार तूर्तास टाळावेत. प्रवासाचे बेत आखाल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. महत्त्वाचे कागदपत्रे तपासून पहावीत. चारचौघांत मिळून मिसळून वागाल.

मिथुन:-तरुण वर्गाशी मैत्री कराल. अधिकारी वर्गाची मदत मिळेल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. क्षणिक सौख्यात रमून जाल.

कर्क:-मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. निसर्ग सौंदर्याची ओढ वाढेल. सर्वांशी आनंदी वृत्तीने वागाल. वातविकाराचा त्रास संभवतो.

सिंह:-सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. घरगुती वापराच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. आवडते खाद्यपदार्थ खायला मिळतील. अनपेक्षित लाभणे खुश व्हाल.

कन्या:-परोपकाराची जाणीव ठेवाल. वैचारिक दृष्टिकोन सुधाराल. अंगभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. दिवस मजेत जाईल. प्रकृतीची हेळसांड करू नका.

तूळ:-जुन्या कामातून लाभ संभवतो. कामे वेळेत पार पडतील. मानसिक द्विधावस्था टाळावी. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

वृश्चिक:-प्रवासात सावधानता बाळगावी. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल. आशावादी दृष्टिकोन वाढीस लागेल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल.

धनू:-सामाजिक कार्यात भाग घ्याल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. स्वत:चा मान राखून वागणे ठेवाल. उपासनेला बळ मिळेल. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात.

मकर:-कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. मन:शांतीसाठी ध्यानधारणा करावी. जवळचे नातेवाईक भेटतील. प्रेमप्रकरणातील घनिष्टता वाढेल.

कुंभ:-आततायीपणे निर्णय घेऊ नका. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. मनातील नैराश्य बाजूस सारावे. प्रवासाचा योग येईल.

मीन:-आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. हसत खेळत कामे साधून घ्याल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य वाढेल. व्यावसायिक लाभणे खुश व्हाल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader