मेष:-तुमचा मान-सन्मान वाढेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कामात वडीलांचा चांगला पाठिंबा मिळेल. मित्रांशी मतभेद वाढू शकतात. कामाबाबतच्या चिंता दूर होतील.

वृषभ:-आध्यात्मिक प्रगती साधता येईल. तुमच्या ज्ञानाचे कौतुक केले जाईल. उपासनेत प्रगती कराल. उत्तम मानसिक शांतता लाभेल. हातातील संधी सोडू नका.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Mangal Gochar 2025
२०२५ मध्ये मंगळ सात वेळा बदलणार राशी, ‘या’ दोन प्रिय राशींना होणार अपार धनलाभ
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Saphala Ekadashi 2024
वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी ‘या’ चार राशींना होणार मोठा धन लाभ, माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती

मिथुन:-फक्त स्वत:च्या फायद्याचा विचार करून चालणार नाही. काटकसरीने वागावे लागेल. वैचारिक गोंधळ टाळावा. मोहाला बळी पडू नका. अचानक धनलाभ संभवतो.

कर्क:-भौतिक सुखाच्या मागे लागू नका. अती अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. फसवणुकीपासून सावध रहा. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.

सिंह:-प्रकृतीची काळजी घ्यावी. आहाराचे योग्य पथ्य पाळावे. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराच्या इच्छेला मान द्यावा लागेल.

कन्या:-कामात दिरंगाई जाणवू शकते. मुलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. सहकार्‍यांवर फार विसंबून राहू नका. काहीतरी नवीन शिकण्याची संधी लाभेल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापरावी.

तूळ:-घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कमिशनमधून चांगली कमाई करता येईल. जोडीदाराचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करा. रागाला आवर घालावी लागेल.

वृश्चिक:-तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. व्यवसायात चांगली प्रगती करता येईल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात. दुचाकी वाहन जपून चालवावे.

धनू:-आवक जावक यांचा योग्य मेळ घालावा. कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल.

मकर:-सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. इतरांना मदत करण्याचा आनंद मिळवाल. तुमच्यातील दिलदारपणा दिसून येईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

कुंभ:-मानसिक चिंता बाजूला साराव्यात. पारमार्थिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ पडेल. मनातील उदासवाणे विचार काढून टाका. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. तुमचा बौद्धिक कस लागू शकतो.

मीन:-पैशाची नड भागली जाईल. मोठ्या लोकांची ओळख होईल. व्यवसायातून चांगला नफा मिळवाल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader