मेष
सूर्योदयापासून चंद्र कुंभ राशीमध्ये आहे. त्यामुळे चंद्राचे हे भ्रमण मेष राशीत शुभ वार्ता देणारे ठरेल. कुलस्वामिनीचे चिंतन करावे.
आजचा रंग – तपकिरी
वृषभ
भविष्यातील महत्त्वाच्या गोष्टींच्या निर्णयांसाठी अत्यंत शुभ दिवस आहे. कुलदैवतांचे स्मरण आणि दर्शन करावे.
आजचा रंग – निळा
मिथुन
कार्यक्षेत्रामध्ये प्रभाव वाढवणारा दिवस. बढतीसाठी प्रयत्न करण्यास शुभ दिवस. गणपतीचे दर्शन घ्यावे आणि गणपती स्तोत्र पठण करावे.
आजचा रंग – राखाडी
कर्क
निर्णयांची अंमलबजावणी जपून करावी. वरिष्ठांची सल्लामसलत करावी. गणपती स्तोत्र म्हणावे.
आजचा रंग – तपकिरी
सिंह
अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायांच्या योजनांसाठी योग्य दिवस. ओम गं गणपतैय नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – लाल
कन्या
वरिष्ठांची, सहकाऱ्यांची मर्जी सांभाळावी. वाद-विवाद वाढवू नयेत. दक्षिणमुखी मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – मोरपंखी
तूळ
आनंदी दिवस. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. लक्ष्मी दर्शन घ्यावे.
आजचा रंग – जांभळा
वृश्चिक
कायदेशीर अपूर्ण कामे मार्गी लागतील. वरिष्ठांशी सुसंवाद साधतील. मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – जांभळा
धनु
आर्थिक विवंचना कमी होतील. पैशांचे नियोजन उत्तम कराल. ओम श्रीं क्लीम भगवतैय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा
मकर
परदेशी प्रवासाचे योग. आर्थिक प्रश्न सुटेल. गणपती आणि मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – लाल
कुंभ
मनाजोग्या घटना घडतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. गणपती अथर्वशीर्ष पठण करावे.
आजचा रंग – लाल
मीन
कर्जाला जामीन राहू नये. मारुती स्तोत्र म्हणावे.
आजचा रंग – पिवळा
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu