1. मेष:-
    क्षणिक सौख्याचा आनंद मिळवाल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. लहानात लहान होऊन रमून जाल. काही कामे दिरंगाईने होतील. औद्योगिक बदल समजून घ्यावेत.
  2. वृषभ:-
    आपल्याच मतावर आग्रही राहाल. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. वादाचे कारण उकरून काढू नका. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल.
  3. मिथुन:-
    पोटदुखीसारखे त्रास संभवतात. एका वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. जोडीदाराशी असणारे मतभेद वाढवू नका. एकमेकांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. वेळेचे योग्य नियोजन कराल.
  4. कर्क:-
    जोडीदाराच्या प्रगतीत हातभार लावावा. पचनाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. व्यायामाचा कंटाळा करू नये. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यापारी वर्गाला फायदा संभवतो.
  5. सिंह:-
    कामाचा उरक वाढेल. कौटुंबिक समस्या भेडसावतील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. तुमच्या मान-सन्मानात भर पडेल. मुलांची प्रगती सुखकर राहील.
  6. कन्या:-
    अतीअपेक्षा ठेवू नये. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ठेवून वागा. परोपकाराची जाणीव ठेवावी. हाता-पायाची दुखणी संभवतात.
  7. तूळ:-
    अनामिक चिंता लागून राहील. समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. प्रवासात सतर्क राहावे. खर्च वाढू शकतो. नातेवाईकांना मदत कराल.
  8. वृश्चिक:-
    पित्तविकाराचा त्रास जाणवेल. कामाचा ताण जाणवेल. किरकोळ इजा होण्याची शक्यता आहे. मनातील निराशा बाजूला सारावी. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.
  9. धनु:-
    डोळ्याची काळजी घ्यावी. काही खर्च आवाक्याबाहेरील वाटू शकतात. नसत्या भानगडीत लक्ष घालू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक चिंता सतावेल.
  10. मकर:-
    अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. कामात दिरंगाई होऊ शकते. चिकाटी ठेवावी लागेल. मनात उगाच नसत्या शंका आणू नका. कौटुंबिक सौख्याकडे लक्ष द्यावे.
  11. कुंभ:-
    मानसिक चंचलता जाणवेल. अभ्यासूवृत्ती ठेवून वागाल. कामात तत्परता दाखवावी. सर्व गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवाल. हसत-हसत कामे कराल.
  12. मीन:-
    कागदपत्रांची योग्य छानणी करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. ओळखीतून कामे करण्याचा प्रयत्न करावा. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. जवळचा प्रवास मजेत होईल.
    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
    Skip
    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर