• मेष:-
    प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. घरातील निटनेटकेपणावर लक्ष द्याल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. भागीदाराशी संबंध सुधारतील. तुमचा परिचय अधिक वाढेल.
  • वृषभ:-
    हाताखालील नोकरांकडून कामे जलद गतीने पार पडतील. कामे मनाजोगी पार पडतील. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जवळचे नातेवाईक भेटतील. दिवस मजेत जाईल.
  • मिथुन:-
    जुगार, सट्टा यांची आवड पूर्ण कराल. करमणुकीवर अधिक भर द्याल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. स्वच्छंदीपणे विचार कराल. छंद जोपासाल.
  • कर्क:-
    कामातील अडचणी दूर कराव्यात. उत्साहाने कामे हाती घ्याल. कामामुळे थकवा जाणवू शकतो. तत्परतेने कामे कराल. वादाचे प्रसंग टाळावेत.
  • सिंह:-
    जुन्या गोष्टी फार मनावर घेवू नयेत. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. पायाचे विकार जाणवतील. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी. झोपेची तक्रार जाणवेल.
  • कन्या:-
    कुटुंबाच्या प्रगतीचा आधी विचार कराल. आर्थिक उन्नती साधता येईल. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. स्थावर मालमत्ता वाढवाल. घराचे नुतनीकरण कराल.
  • तुळ:-
    कामात सकारात्मक बदल करावेत. कामाची गती वाढेल. मनाजोगा फायदा करून घेता येईल. व्यापाऱ्यांनी सतर्कता दाखवावी. सरकारी कामावर वेळ खर्च होईल.
  • वृश्चिक:-
    चुकीच्या संगतीत अडकू नका. मनात आकारण भीती बाळगू नका. मानसिक चंचलता जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. धार्मिक कामात सहभाग घ्याल.
  • धनु:-
    काही कामांना पुरेसा वेळ द्यावा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. स्त्रीदाक्षीण्य दाखवाल. जवळचे मित्र भेटतील. एकाच गोष्टीवर फार काळ रेंगाळत राहू नका.
  • मकर:-
    जोडीदाराचे कौतुक कराल. सामाजीक वजन वाढेल. नावलौकिकास पात्र व्हाल. अपेक्षित वेळेत कामे पूर्ण होतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
  • कुंभ:-
    कामावर श्रद्धा ठेवाल. वैचारिक भव्यता दाखवाल. बौद्धिक दृष्टीकोनातून विचार कराल. दानशूरता दाखवाल. स्वत:चा मान जपाल.
  • मीन:-
    मुलांच्या कारवायांकडे लक्ष द्यावे. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक गैरसमज टाळावेत. हितशत्रूंवर लक्ष ठेवावे.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा