मेष
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदार्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग –पांढरा
वृषभ
गुरूलीलामृतचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडीत नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतीत. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल.
आजचा रंग – फिक्कट पिवळा
मिथुन
गणपती मंदिरात दानधर्म करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको.
आजचा रंग –सोनेरी
कर्क
ॐ केशवाय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस आहे. व्यवसायांशी निगडीत एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –निळा
सिंह
गणेश अष्टकाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये, प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग -केशरी
कन्या
गणपती व मारूतीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. मुलांशी निगडीत किंवा घरांतील धाकट्या भावंडांशी निगडीत चांगली वार्ता समजेल, त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणींमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायांमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग –जांभळा
तुळ
ॐ हरेय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरूवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते.
आजचा रंग -नारंगी
वृश्चिक
मंदिरामध्ये अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. भावंडांशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील.
आजचा रंग –गुलाबी
धनु
मंदिरामध्ये अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडीत व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांसाठी उत्तम दिवस आहे. धन स्थिती उत्तम राहील. छोट्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –हिरवा
मकर
कालभैरवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. आजचे ग्रहमान सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.
आजचा रंग –पोपटी
कुंभ
कालभैरव पाठ सकाळी आणि संध्याकाळी करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांची मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग- जांभळा
मीन
कुलस्वामिनीला हिरव्या वस्तू अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल, सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.
आजचा रंग – नारंगी
डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu