- मेष:-
जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. प्रेम सौख्यात भर पडेल. कर्तव्यदक्षता दाखवण्यात मागे हटू नका. नि: स्वार्थीपणे मदतीला धावून जाल. समाधानी असाल. - वृषभ:-
आपल्यातील गुणांना वाव द्यावा. हाताखालील व्यक्तींची योग्य मदत मिळेल. आळस बाजूला सारवा. मोहाच्या बळी पडू नका. नातेवाईकांनी मदत घ्यावी लागेल. - मिथुन:-
निसर्गाच्या सानिध्यात रमाल. मजेत दिवस घालवाल. वादन कलेचे कौतुक केले जाईल. करमणूकीची हौस पूर्ण कराल. सर्जनशीलता दाखवाल. - कर्क:-
निर्मळपणे सर्वांना आपलेसे करून घ्याल. घरात समाधान नांदेल. अतंरीचे समाधान लाभेल. बागकामाची आवड जोपासाल. घरासाठी मोठ्या वस्तू खरेदी कराल. - सिंह:-
छंद जोपासण्याची आवड पूर्ण कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आनंदी वृत्तीने वागल. कल्पना शक्तीला वाव मिळेल. वाचनत रमून जाल. - कन्या:-
कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. काटकसरीने वागाल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. सर्वांशी गोड बोलाल. इतरांवर चांगली छाप पाडाल. - तूळ:-
वागण्यात विषयासक्तपणा दिसून येईल. सर्वांशी मिळून मिसळून वागाल. प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल. आवडते पदार्थ चाखायला मिळतील. हौस पूर्ण कराल. - वृश्र्चिक:-
लपवाछपवी कराल. दुरच्या प्रवसाचा योग येईल. फसवणूकीपासून सावध राहा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. उत्तम स्त्री सौख्य लाभेल. - धनु:-
वागण्यात शालिनता दर्शवाल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. व्यवसायात उत्तम लाभ मिळेल. आर्थिक गरज पूर्ण होईल. - मकर:-
औद्योगीक वातावरण चांगले असेल. नशीब आजमवायला मिळेल. पतीचा सुस्वभावीपणा दिसून येईल. सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल. इतरांचे मन जिंकून घ्याल. - कुंभ:-
मनाची विशालता दाखवाल. धार्मिक वृत्ती जोपासली जाईल. कलेला पोषक वातावरण मिळेल. लेखन प्रसिद्ध होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. - मीन:-
कमी श्रमात कामे होतील. वारसाहक्काची कामे निघतील. सांपत्तिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. अचानक धनलाभ होईल. रेस, सट्टा यातून फायदा संभवतो.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, बुधवार, ०९ ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 09-10-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 09 october 2019 aau