- मेष:-
कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. गायन कलेला प्रोत्साहन मिळेल. गोड पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल. - वृषभ:-
दिवस मनासारखा घालवाल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनातून गैरसमज दूर करावेत. पारंपरिक कामातून धनलाभ होईल. - मिथुन:-
मानसिक शांतता राखली जाईल. इतरांना आनंदाने मदत कराल. आध्यात्मिक बळ वाढेल. समाजप्रियता वाढीस लागेल. चुगल्या करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. - कर्क:-
मुलांच्या स्वच्छंदी वागण्याची चिंता वाटेल. मैदानी खेळ खेळाल. अपचनाचा त्रास जाणवेल. तुमच्यातील चपळाई दाखवावी लागेल. कौशल्य पणाला लावून काम कराल. - सिंह:-
कामाचा आनंद मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. सुखासक्तपणा जाणवेल. आळस दूर सारून कामे करावीत. तुमच्या कार्यपद्धतीचा प्रभाव पडेल. - कन्या:-
तांत्रिक ज्ञानावर भर द्यावा लागेल. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. लहरिपणाने वागू नये. डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. - तूळ:-
अडथळ्यातून मार्ग काढाल. कामाचा जोम वाढेल. उतावीळपणा करून चालणार नाही. महात्त्वाकांक्षेच्या जोरावर कामे हाती घ्याल. तुमचा रुबाब दिसून येईल. - वृश्चिक:-
स्वभावात मानिपणा दाखवाल. वागण्यातून आत्मविश्वास दर्शवून द्याल. सर्वांचे लक्ष वेधून घ्याल. काही वेळेला कणखरपणा दाखवावा लागेल. सामाजिक दर्जा सुधारेल. - धनु:-
चारचौघात मिळूनमिसळून वागाल. प्रत्येक गोष्टीत आनंद शोधाल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. मानाजोगी खरेदी करता येईल. तुमची हौस भागवून घ्याल. - मकर:-
हातात नवीन अधिकार दिले जातील. तुमचे अस्तित्व सिध्द करता येईल. मान मिळवण्यासाठी सतत प्रयत्न कराल. कमिशन मधून कमाई होईल. आर्थिक दर्जा सुधारेल. - कुंभ:-
सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्यावा. मनातील भावना उत्तम प्रकारे मांडाल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. बढतीसाठी प्रयत्न करा. तुमचा प्रभाव दिसून येईल. - मीन:-
स्वभावातील मानीपणा दूर सारावा. महत्त्वकांक्षा वाढिस लागेल. हातात नवीन अधिकार येतील. तुमचा मान वाढेल. तुमच्या कलेची योग्य दखल घेतली जाईल.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 11-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 11 december 2019 aau