मेष

नारायणाय नम:. व्यावसायिक आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्तम नियोजनाचा दिवस आहे. नोकरदारमंडळींना नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक स्थितीमध्ये सुधार होर्इल. नोकरीमध्ये अनुकूल ग्रहमान राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रहमान उत्तम आहे.
आजचा रंग –हिरवा

Gurupushyamrut yog
Gurupushyamrut Yoga : गुरुपुष्यामृताचा शुभ योग साधण्यासाठी उमेदवारांची धडपड, मुहुर्तावर कोण-कोण अर्ज भरणार?
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Diwali Lakshmi Pujan 2024 Shubh Muhurat in Marathi
Diwali Lakshmi Puja 2024 : ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर? तुमच्या शहरानुसार जाणून घ्या, लक्ष्मीपूजनाची योग्य तारीख अन् मुहूर्त
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशींचा श्रीमंतीचा मार्ग होणार मोकळा? वाचा तुमचे भविष्य
Surya Gochar sun transit in guru rashi dhanu
Surya Gochar 2024 : सूर्य देव करणार गुरूच्या राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशी होणार मालामाल; मिळणार धनसंपत्ती अन् अपार पैसा
11th October Rashi Bhavishya In marathi
११ ऑक्टोबर पंचांग: चारचौघात कौतुक ते प्रेम-मैत्रीची साथ, आज सिद्धिदात्री देवी १२ पैकी ‘या’ राशींना पावणार; वाचा तुम्ही आहात का नशीबवान?
Rashi Bhavishya & Panchang 7th October | shardiya Navratri 2024 | lalita panchami
०७ ऑक्टोबर पंचांग : ललिता पंचमीचा शुभ दिवस ‘या’ राशींच्या आयुष्यात आणेल सौभाग्य, संपत्ती आणि सुखाचे क्षण! वाचा तुमचे राशीभविष्य
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी ब्रह्मचारिणीची कृपा; व्यवसायात नफा ते नवी ओळख; वाचा शुक्रवारचे तुमचे राशिभविष्य

वृषभ

हरिप्रसादाय नम:. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वपूर्ण व्यावसायिक घडामोडींसाठी अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासाचे योग संभवतात. नवीन कामांची सुरूवात करू शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायिकांसाठी ग्रहमान अनुकूल. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग –हिरवा

मिथुन

भालचंद्राय नम:. मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावे. जमिनीमधील गुंतवणूक करता असताना कायदेशीर गोष्टींचा विचार करावा. सर्वांचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावे.
आजचा रंग –ऑफ व्हाइट

कर्क

कर्पूरगौराय नम:. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. सर्वांचे सहकार्य प्राप्त होर्इल. सर्व प्रकारच्या गुंतवणुकीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसायिक हितसंबंध दॄढ करता येतील.
आजचा रंग –फिक्कट पिवळा

सिंह

शांभवे नम:. अधिकारी वर्गासाठी महत्त्वाचा दिवस आहे. महत्त्वकांक्षी योजना राबविता येतील. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. वरिष्ठांकडून कौतुक होर्इल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग -केशरी

कन्या

कॄष्णपिंगाक्षाय नम:. भाग्यकारक दिवस आहे. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेता येतील. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये लाभकारक ग्रहमान आहे.
आजचा रंग –निळा

तुळ

सुरेश्वराय नम:. मोठे व्यावसायिक धाडस करू नये. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. व्यवसायामध्ये जुन्या हितसंबंधामधून लाभाची शक्यता आहे. अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील. दिवसाचे नियोजन उत्तम पध्दतीने करावे. दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे.
आजचा रंग -नारंगी

वृश्चिक

विघ्नराजेंद्राय नम:. व्यावसायिक वाढीचा दिवस आहे. व्यवसायामध्ये नावीन्यपूर्ण बदल करू शकाल. महत्त्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करता येर्इल. कौटुंबिक सौख्य लाभेल. पतीपत्नींमधील दुरावा कमी होर्इल.
आजचा रंग –केशरी

धनु

गजवक्राय नम:. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. मोठे आर्थिक उलाढाल करताना चर्चा, सल्लामसलत करावी. प्रवास करता असताना दक्षता बाळगावी. वाताचे विकार असलेल्यांनी प्रकॄतीची काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी प्रकॄतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग –केशरी

मकर

धुम्रवर्णाय नम:. महत्त्वकांक्षी निर्णय घेऊ शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. नोकरदार मंडळींना आर्थिक लाभाचा दिवस आहे. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –हिरवा

कुंभ

वक्रतुंडाय नम:. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडविता येतील. महत्त्वपूर्ण आर्थिक घडामोडींचा दिवस आहे. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडविता येतील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, जमिनीचे खरेदीविक्री करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहेत. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग-मोरपंखी

मीन

सुमितााय नम:. आज कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. भावंडांशी गाठीभेटी होतील. महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. व्यवसायामध्ये स्पर्धेचे वातावरण असेल. प्रगतीकारक ग्रहमान आहेत.
आजचा रंग –हिरवा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu