मेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओम गोवर्धनपतये नम:. प्रकॄतीची काळजी घ्यावी. वाताविकार, पचनाचे विकार असणाऱ्यांनी दक्षता घ्यावी. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. शिक्षण, वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत असणाऱ्यांनी अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –पांढरा

वृषभ

र्इशान्येय नम:. महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. आर्थिक अडचण कमी होर्इल. आप्तेष्ठांचा सहवास लाभेल.
आजचा रंग – फिक्कट पिवळा

मिथुन

अत्रिनंदनाय नम:. कौटुंबिक सौख्य जाणवेल. आनंदी दिवस आहे. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. महिला आणि गॄह उद्योगांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग –नारंगी

कर्क

नरविराय नम:. व्यावसायिक स्पर्धेचा दिवस आहे. प्रगताीकारक ग्रहमान आहे. मित्र मंडळींमध्ये वेळ आनंदात जार्इल. वाहने जपून चालवावीत. जमीन आणि पाण्याशी निगडीत व्यवसायांमध्ये यश संभवते.
आजचा रंग –निळा

सिंह

श्रीवर्धनाय नम:. धनस्थिती उत्तम राहील. अडचणींवर मात करू शकाल. जुनी येणी वसुल करण्याच्या दॄष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग -केशरी

कन्या

शक्तयातमने नम:. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. निर्णय क्षमता उत्तम राहील. व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये दिरंगार्इ नको.
आजचा रंग –जांभळा

तुळ

जगदप्राय नम:. मोठे आर्थिक नियोजन करता असताना सावध राहावे. वादविवाद टाळावेत. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग -ऑफ व्हाइट

वृश्चिक

ओम विश्वरूपाय नम:. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. नवीन संधींचा लाभ घेता येर्इल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवीन योजना राबवू शकाल.
आजचा रंग –गुलाबी

धनु

असैयाय नम:. अधिकारी व्यक्तीसाठी उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. कमोडिटी, शेअर्समध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल. आध्यतिमकता वाढेल.
आजचा रंग –हिरवा

मकर

परमेशाय नम. उत्तम ग्रहमानाचा लाभ होर्इल. व्यवसायामध्ये स्थिरता जाणवेल. नोकरदार मंडळींना कामाचा आणि प्रवासाचा अतिरिक्त ताण येर्इल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पोपटी

कुंभ

चैतन्याय नम:. प्रवास सावधानतेने करावा. आर्थिक नियोजनामध्ये खंबीर निर्णय क्षमता ठेवावी. प्रवासाचे नियोजन उत्तम पध्दतीने करावे. कमोडिटी मार्केट, शेअर्स, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग- जांभळा

मीन

अमराय नम:. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. नवीन संधींचा लाभ होर्इल. जुनी कामे, योजना मार्गी लावू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटूंबाशी निगडीत प्रश्न सोडवता येतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – तपकिरी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 12 september
Show comments