मेष

मिथुन राशीतील चंद्र स्पर्धामध्ये आपली स्थिती बळकट करणारा आहे. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तसेच, स्पर्धेच्या योजनेसाठी देखील हा दिवस चांगला आहे. गणपती मंदिरामध्ये लाल फुले अर्पण करावीत. ओम श्री गं गणपतेय नम: चा जप करावा.
आजचा रंग- हिरवा

वृषभ

राशीतील चंद्राचे भ्रमण आज फलदायी ठरणार आहे. पुर्वी केलेल्या चांगल्या कामाचा आज तुम्हाला मोबदला मिळू शकतो. भावंडांशी भेटीगाठीचे आज योग आहेत. ओम द्रां द्रीं आदि गुरवे नमः या मंत्राचा ११ वेळा जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग- राखाडी

मिथुन

राशीतच चंद्राचे भ्रमण असल्यामुळे सकाळपासूनच दिनचर्यात उत्साह जाणवेल. दुरच्या प्रवासासाठी नियोजन, कुटुंबासोबत सहलीसाठी बाहेर जाण्याचा योग येईल. एकंदरीत दिवस आनंदी जाईल. कुलस्वामिनीची ओटी भरावी.
आजचा रंग- हिरवा

कर्क

दिवसाची सुरुवात सावध करावी. गणपती आणि कुलस्वामिनीचे स्मरण करुन दिवसाची सुरुवात करावी. जबाबदार व्यक्तीने संभाव्य धोकांचा परिणाम विचारात घेऊनच निर्णय घ्यावे.
आजचा रंग- पिवळा

सिंह

आज तुमचे काम वरिष्ठांच्या लक्षात येण्याजोगे असेल. चांगली शाबासकी मिळू शकेल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. रागावर नियंत्रण ठेवावे.
आजचा रंग- नारंगी

कन्या

वरिष्ठांची मर्जी राहील. कामात सहकार्य लाभेल. आनंददायी दिवस जाईल. महादेवाची उपासना करावी.
आजचा रंग- पोपटी

तुळ

आलेल्या संधीचा पाठपुरावा केल्यास योग्य फळ मिळेल. गणपतीची उपासना करावी. प्रवासाचे योग येतील
आजचा रंग- तपकिरी

वृश्चिक

निर्णय जपून घ्यावेत. वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. भावंडाशी वाद करू नये. रामरक्षेचे पाठ करावेत. मारुती स्तोत्र म्हणावे.
आजचा रंग- तपकिरी

धनु

गपणती उपासनेनी दिवसाची सुरुवात करावी. व्यावसायिक नियोजनांसाठी आजचा दिवस साधारण आहे. धाडसी निर्णय घेऊ नयेत. वादविवाद टाळावेत.

मकर

आज सावधपणे दिवसाची सुरुवात करावी. देवी कवच आणि गणपती स्तवन करुन दिवसाची सुरुवात करावी. कुठलाही महत्वाचा निर्णय आज घेऊ नये.
आजचा रंग- मोरपंखी

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी हा आठवडा खूप चांगला जाईल. अनेक योजना, आर्थिक नियोजन मार्गी लागतील. स्थिर चित्ताने दिवस घालवा निश्चितच लाभ होईल. गणपती अष्टकाने दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग- नारंगी

मीन

नोकरी व्यवसायात सुसंधीचे योग आहेत. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांशी सुसंवाद राहील. गणपती मंदिरामध्ये हिरव्या वस्तू दान करणे. आजचा रंग- निळा
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu