- मेष:-
दिवस प्रसन्नतेत उगवेल. गोष्टी मनासारख्या घडतांना दिसून येतील. आरोग्यात सुधारणा होईल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. भागीदारीत चांगला फायदा संभवतो. - वृषभ:-
नसती भांडणे उकरून काढू नयेत. थापा मारू नयेत. इतरांचा विश्वास संभवतो. भांडणे विकोपाला जावू देवू नयेत. फक्त कामावर लक्ष केंद्रित करावे. - मिथुन:-
तुमची बौद्धिक बाजू दाखवून द्याल. घरगुती प्रसंग घरातच मिटवावेत. वाहन विषयक कामात खास लक्ष घालावे. मनातील अपेक्षांना अधिक महत्त्व द्याल. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ संभवतो. - कर्क:-
पराक्रमाला चांगला वाव आहे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांशी मतभेद वाढवू नका. तुमच्यातील कलागुणांना वाव द्यावा. नोकरदार स्त्रियांना प्रगती करता येईल. - सिंह:-
आवक-जावक यांचे नीट गणित मांडावे. रागावर नियंत्रण ठेवावे. अनाठायी खर्च करू नका. गायन कलेला प्रसिद्धी मिळेल. नि:स्वार्थीपणे इतरांना मदत कराल. - कन्या:-
दृढनिश्चय करावा लागेल. झेपेल एवढेच काम हाती घ्यावे. मनाजोगी खरेदी करता येईल. चांगला आर्थिक लाभ होईल. कामाची धावपळ थोडी कमी होईल. - तूळ:-
मनाच्या चंचलतेवर उपाय शोधावा लागेल. चुकीच्या लोकांच्यात सामील होवू नका. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. दिवस आळशीपणात घालवाल. - वृश्चिक:-
घरगुती कार्यक्रमात सहभाग घ्याल. अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. मोठ्या लोकांच्या ओळखीतून कामे पार पडतील. खोट्या गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. जुनी कामे निघतील. - धनु:-
नवीन मित्र जोडले जातील. कामाचा चांगला मोबदला मिळेल. मानसिक समाधान लाभेल. पत्नीची उत्तम साथ लाभेल. घरासाठी ऐषारामाच्या वस्तू खरेदी कराल. - मकर:-
नसत्या भानगडीत पडू नका. शक्यतो वरिष्ठांना नाराज करू नका. कामात अडकून पडल्यासारखे वाटू शकते. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. प्रवासात वाहन चालवितांना काळजी घ्यावी. - कुंभ:-
थंड पदार्थांचे सेवन करावे. किरकोळ जखमांवर वेळीच उपाययोजना करावी. हातापायाची काळजी घ्यावी. शारीरिक कष्ट वाढू शकतात. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. - मीन:-
मुलांच्या खोड्या वाढू शकतात. जोडीदाराशी अनबन होवू शकते. गैरसमजाला मनात थारा देवू नका. भागीदारीत सामोपचार ठेवावा. जनक्षोभाला बळी पडू नका.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, बुधवार, १६ ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 16-10-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 16 october 2019 aau
Show comments