• मेष:-
    इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. अति विचार करणे टाळावे. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात. घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढू नका. कामावर लक्ष केंद्रित करावे.
  • वृषभ:-
    सामाजिक बांधिलकी जपाल. कलेतून मानधन मिळेल. गप्पांमधून मैत्री वाढीस लागेल. गृहशांती जपावी. करमणुकीची साधने शोधाल.
  • मिथुन:-
    मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्याल. अधिकारी व्यक्तीचा सल्ला घ्याल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. उर्जेने कामे कराल. हातातील कामात यश येईल.
  • कर्क:-
    भडक शब्द वापरू नका. चोरांपासून सावध राहावे. कोणाविषयी मत्सर मनात ठेवू नका. प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली पाहिजे असा हट्ट करू नका. अनावश्यक खर्च टाळावा.
  • सिंह:-
    पित्त विकाराचा त्रास जाणवू शकतो. अनाठायी होणारी चिडचिड दूर सारावी. संयम फार महत्त्वाचा आहे. कौटुंबिक जबाबदारी आनंदाने घ्याल. खर्चाचे योग्य नियोजन करावे.
  • कन्या:-
    बोलक्या स्वभावाचा योग्य वापर करावा. कामात उत्साह जाणवेल. अनाठायी होणारा खर्च टाळावा. सामाजिक भान राखून वागावे. तडकाफडकी कोणतीही गोष्ट करू नका.
  • तूळ:-
    भावनेच्या भरात सर्व गोष्टी बोलू नका. झोपेची तक्रार जाणवेल. खोटे कागदपत्र सादर करू नका. लबाड लोकांपासून सावध राहावे. अभ्यासू लोकांशी मैत्री करावी.
  • वृश्चिक:-
    लहान मुलांमध्ये लहान होवून रमून जाल. गप्पागोष्टी करण्यात वेळ घालवाल. तरुणांशी मैत्री जोडाल. स्त्रीवर्गाशी ओळख वाढेल. अधिकारी लोक भेटतील.
  • धनु:-
    कामापेक्षा इतर गोष्टीत लक्ष घालाल. सरकारी कामावर लक्ष ठेवा. फायद्याकडे अधिक लक्ष द्याल. पुढील परिस्थितीचा अंदाज घ्यावा. कल्पकता वापरावी.
  • मकर:-
    आपले मत योग्य ठिकाणीच मांडावे. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. खर्च आवरता घ्यावा. धोरणीपणे वागावे लागेल. बौद्धिक छंद जोपासावेत.
  • कुंभ:-
    उगाचच त्रागा करू नका. गैरसमजामुळे त्रास होऊ शकतो. भागीदाराची बाजू समजून घ्यावी. चारचौघात अधिकाराने बोलाल. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
  • मीन:-
    जोडीदाराच्या बोलण्याने भारावून जाल. जनसंपर्कात भर पडेल. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. काही गोष्टी समजुतीने घ्याव्या लागतील. मनाविरुद्ध असलेल्या गोष्टींचा स्वीकार करता आला पाहिजे.
    आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 18 september 2019 aau