- मेष:-
प्रवासात काहीसा त्रास जाणवतो. कामातील तांत्रिक गोष्टी जाणून घ्याव्यात. वैद्यकीय व्यवसायातील लोकांना दिवस चांगला जाईल. उपासनेला बळ मिळेल. स्वकष्टावर अधिक भर द्याल. - वृषभ:-
वैवाहिक खर्च वाढू शकतो. काही गोष्टी अचानक घडू शकतात. मनातील आकांक्षा पूर्ण कराल. सरकारी कामात अधिक लक्ष घालावे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. - मिथुन:-
कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा लागेल. भागीदाराशी क्षुल्लक कारणावरून मतभेद संभवतात. नवीन लोकांशी सबुरीने वागावे. कोणतीही गोष्ट फार ताणू नका. कलेसाठी अधिक वेळ काढावा. - कर्क:-
कामाच्या ठिकाणी रूबाब वाढेल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. छुप्या शत्रूंचा त्रास कमी राहील. नातेवाईकांशी सबुरीने वागावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. - सिंह:-
मुलांच्या धावपळीकडे लक्ष ठेवावे. शक्यतो पैजेत भाग घेऊ नका. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल. - कन्या:-
जमिनीच्या कामातून लाभ होईल. घरातील शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. वाहन विषयक कामांना गती येईल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. वैवाहिक सौख्यात भर पडेल. - तूळ:-
भावंडाचे सहकार्य मोलाचे ठरेल. कामात अधिक ऊर्जा येईल. हातात नवीन अधिकार येतील. स्वबळावर कामे हाती घेता येतील. काहीसा सुस्तपणा जाणवेल. - वृश्चिक:-
मुलांच्या कालगुणांना वाव द्यावा. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. मित्र-परिवार जमवाल. गप्पा-गोष्टींची आवड पूर्ण कराल. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री वाढेल. - धनु:-
घाईने निर्णय घेऊ नका. आपल्यातील ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करावा. काही बदल जाणीवपूर्वक करावेत. खर्चाकडे लक्ष ठेवावे. कौटुंबिक प्रश्न आधी मार्गी लावावेत. - मकर:-
प्रवासात काळजी घ्यावी. कौटुंबिक सहलीचे आयोजन कराल. परिस्थिती लक्षात घेऊन वागावे. जुन्या गोष्टी मनातून काढून टाकाव्यात. हस्तकलेला अधिक वेळ द्यावा. - कुंभ:-
सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. हजरजबाबीपणा दाखवाल. आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. मानसिक स्वास्थ्य जपावे. - मीन:-
तुमच्यातील कलेचे सर्वदूर कौतुक केले जाईल. प्रेमळपणे गोष्टी साध्य करता येतील. दिवस आपल्या मर्जी प्रमाणे घालवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. सर्वांशी लाघवीपणे बोलाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, बुधवार, १९ फेब्रुवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 19-02-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 19 february 2020 aau