• मेष:-
    जुगारातून धनलाभ संभवतो. जोडीदाराशी मतभेद संभवतात. एकमेकांची बाजू समजून घ्यावी. चारचौघात जपून बोलावे. चर्चेतून समस्या सोडवाव्यात.
  • वृषभ:-
    घरात कर्तेपणाचा मान मिळवाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. मित्रमंडळींचा गोतावळा जमवाल. दिवस मजेत घालवाल. कामात स्थैर्य लाभेल.
  • मिथुन:-
    कामानिमित्त प्रवास करावा लागेल. बौद्धिक मूल्यमापन कराल. आशावादी दृष्टिकोन ठेवाल. नवीन कपडे खरेदी कराल. आपले मत इतरांना व्यवस्थित पटवून द्याल.
  • कर्क:-
    कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. सर्वांशी प्रेमाने वागाल. जवळच्या मित्रांच्या सहवासात रमाल. तुमच्या वागण्याचे कौतुक केले जाईल.
  • सिंह:-
    गोष्टी मनाप्रमाणे करण्यावर भर द्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. सर्वांशी आदराने वागाल. कामाचा उत्तम मोबदला मिळेल. दिवस काहीसा आळसात घालवाल.
  • कन्या:-
    मानसिक शांतता जपावी. धार्मिक स्थळांना भेट द्याल. अतिविचार करू नयेत. सामाजिक कामात मदत कराल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.
  • तूळ:-
    रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. बोलतांना भडक शब्दांचा वापर टाळावा. अडचणीतून मार्ग काढाल. उगाचच कोणाशीही शत्रुत्व पत्करू नका. उष्णतेचे त्रास जाणवतील.
  • वृश्चिक:-
    पायाचे विकार त्रास देतील. अनावश्यक खर्च टाळावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. स्त्रीवर्गाशी जपून वागावे. नसत्या चिंता करत बसू नका.
  • धनु:-
    मध्यस्थीच्या कामातून लाभ संभवतो. कौटुंबिक सौख्याचा अधिक विचार कराल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. स्थावरची कामे सुरळीत पार पडतील.
  • मकर:-
    व्यवसायातून चांगला लाभ मिळेल. व्यावसायिक वाढीच्या दृष्टीने पाऊल उचलाल. बढतीची चिन्हे दिसू लागतील. आरोग्यात सुधारणा होईल. आध्यात्मिक बळ वाढवाल.
  • कुंभ:-
    अंगीभूत कलेला चांगला वाव मिळेल. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील. हातातील कामात यश येईल. ओळखीचा सदुपयोग करून घ्यावा.
  • मीन:-
    मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामाचा मनापासून आनंद घ्याल. जवळचे नातेवाईक भेटतील. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. कामाचा उत्तम मोबदला मिळेल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर