मेष

आजचा दिनविशेष उत्तरायणाला प्रारंभ होत आहे. याला मकरायन म्हणतात. मेष राशीच्या व्यक्तींनी आजचा दिवस काळजीपूर्वक घालवावा. नको असलेल्या कामात आपली ऊर्जा घालवू नये. वेळेचे योग्य नियोजन करावे. कुलस्वामिनीला हिरव्या वस्तू अर्पण करावे.
आजचा रंग – तपकिरी

वृषभ

आज कन्या राशीतला चंद्र वृषभेला लाभदायक ठरणार आहे. अनेक कामे मार्गी लागण्याची दृष्टीने चांगला दिवस आहे. बॅंक, कोर्ट कामात प्रगती कराल. विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम आहे. प्रयत्न करावेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. कालभैरव अष्टक पाठ सकाळी आणि संध्याकाळी करणे.
आजचा रंग – पिवळा

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Astrology Predictions Number 1 in Marathi
Astrology Predictions Number 1: मूलांक १ चे कसे असेल नवे वर्ष? धनलाभ, प्रेमात अडचणी, तर यंदा ‘या’ महिन्यानंतर सुरू होतील अच्छे दिन
Mangal Gochar 2025
२०२५ मध्ये मंगळ सात वेळा बदलणार राशी, ‘या’ दोन प्रिय राशींना होणार अपार धनलाभ
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Saphala Ekadashi 2024
वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी ‘या’ चार राशींना होणार मोठा धन लाभ, माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा

मिथुन

भाग्यकारक घटनांचा दिवस, आज अनेक वेगवेगळ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. अनेकांचे सहकार्य लाभेल. गेल्या अनेक दिवसांपासून कामाच्या दगदगीमुळे कुटुंबाला जर वेळ देऊ शकला नसाल तर आज कुटुंबासोबत वेळ घालवण्याची उत्तम संधी आहे. कुटुंबातील झालेले गैरसमज दूर करण्यासाठी वातावरण तयार होईल. कालभैरवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग- तपकिरी

कर्क

आज कन्या राशीतला चंद्र कर्कच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणारा आहे. लाभाचे प्रमाण वाढेल. मुलांना कौतुकाची थाप मिळेल. गृहिणींना आज आनंदाचा दिवस आहे. ओम श्री हरये नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग- पिवळा

सिंह

आज संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. पण, योग्य नियोजनां आणि शांत चित्ताने काम केल्यास संधी मिळू शकतात. भविष्यात उपयोगी पडतील अशी माणसे भेटतील. त्यामुळे सर्वांशी संवाद ठेवावा. ओम श्री हरये नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग- पोपटी

कन्या

आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीतून असणार आहे. गुरू सध्या कन्या राशीत असल्याने खूप उत्साहात वाढवणारी ग्रहदशा आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. साहित्यिक, शेअर ब्रोकर, विद्यार्थी नोकरदार, सर्वांना आजचा दिवस भाग्यकारक घटनांचा असेल नवीन हितसंबंध जुळतील. ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा

तुळ

चंद्र कन्या राशीत पूर्ण दिवस असणार आहे. त्यामुळे सावध राहून निर्णय घ्यावेत. घाई करू नये. स्थिर चित्त ठेवणए गरजेचे आहे. साडेसातीची शेवटचा टप्पा काही महिने राहिला आहे. गणपती आणि मारुतीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग- निळा

वृश्चिक

चंद्राचे कन्या राशीतील भ्रमण वृश्चिकेला सुखकारक असणार आहे. नवीन योजना कार्यान्वित कराव्यात. जुन्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी योग्य दिवस आहे. गणेश अष्टकाचे पाठ करावेत
आजचा रंग – नारंगी

धनु

कन्या राशीतील चंद्राचे भ्रमण लाभदायी आहे. अधिकारी वर्गाची मर्जी राहील, घरातील ज्येष्टांची काळजी घ्यावी. संततीबाबत एखादी चांगली बातमी कळेल. दिवस शुभ आहे. ओम केशवाय नमः जप करावा.
आजचा रंग- पिवळा

मकर

आज कन्या राशीतील चंद्राचे भ्रमण मकर राशीला भाग्यकारक घटना घेऊन येणारे ठरू शकते. आज अनेक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. योग्य पाठपुरावा करावा. आनंदी दिवस कौटुंबिक सौख्य लाभेल. गणपती मंदिरात दानधर्म करणे.
आजचा रंग – पिवळा

कुंभ

मनस्वास्थ जपावे, राग व्यक्त करू नये. दीर्घकाळ त्रास होऊ शकतो, आर्थिक ताण तणाव येऊ शकतात. अचानक खर्च वाढू शकतो. परंतु कुटुंबाचे सहाकार्य लाभेल. गुरुलीलामृताचे पाठ करावेत.
आजचा रंग- नारंगी

मीन

व्यावसायिकांना उत्तम दिवस. कोर्ट कचेऱ्या, कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. वैवाहिक योग उत्तम. ओम हरय नमः चा जप करावा.
आजचा रंग- नारंगी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader