- मेष:-
धार्मिक कामात हातभार लावाल. सेवेचे महत्व जाणून वागाल. परदेशगमनाचा योग येईल. आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांची गाठ पडेल. सामाजिक सेवेत काम कराल. - वृषभ:-
जोडीदाराशी मतभेद संभवतात. मानसिक स्थैर्य जपावे. जुन्या कामातून लाभ संभवतो. वारसा हक्काच्या कामात लक्ष घालावे लागेल. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. - मिथुन:-
उत्कृष्ट वैवाहिक सौख्य लाभेल. उगाचच मतभिन्नता दाखवू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वातविकाराचा त्रास जाणवेल. फार तिखट पदार्थ खाऊ नयेत. - कर्क:-
मानसिक शांतता जपावी. क्षुल्लक कटकटी नजरेआड कराव्यात. आत्मविश्वास बाळगावा लागेल. कफ विकार जाणवतील. तुमची चिडचिड वाढू शकते. - सिंह:-
शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. अंत:स्फूर्तीने कामे कराल. सूचक स्वप्ने पडतील. जुगाराची आवड दाखवाल. काहीसे स्वछंदीपणे वागाल. - कन्या:-
उत्तम गृहसौख्य लाभेल. घरात थोर व्यक्तींची ऊठबस राहील. भावंडांची बाजू जाणून घ्या. चांगले वाहन सौख्य लाभेल. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. - तूळ:-
मानसिक चंचलता जाणवेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. मानसिक संवेदना दाखवाल. सर्वांशी प्रेमळपणे वागणे ठेवाल. नवीन गोष्टी जाणून घ्याल. - वृश्चिक:-
कौटुंबिक कार्यक्रम आखले जातील. अडथळ्यातून मार्ग काढाल. मेहनतीला मागे हटू नका. कामात उतावीळपणा करू नका. हट्टीपणे वागणे राहील. - धनू:-
आपल्या मनाप्रमाणे वागाल. वैचारिक प्रौढता दाखवाल. सामाजिक जाणिवेतून कामे कराल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. गैरसमजुतीला बाजूला ठेवा. - मकर:-
कामात क्षुल्लक कारणाने दिरंगाई होईल. पारमार्थिक उन्नती साधता येईल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. बौद्धिक दिमाख दाखवाल. कामात चलाखी दाखवाल. - कुंभ:-
सुसंस्कृत लोकांच्यात वावराल. सांपत्तीक अपेक्षा पूर्ण होतील. अत्यंत व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. काटकसरीने वागाल. अधिकारी व्यक्तींच्या ओळखी होतील. - मीन:-
कामाची धांदल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका. अधिकारी व्यक्तींची मदत मिळेल. प्रवासात सावधानता बाळगावी. तुमचा मान वाढेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, बुधवार, २२ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 22-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 22 january 2020 aau