मेष

व्यंकटेशाय नम:. भाग्यकारक दिवस आहे. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेता येतील. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये लाभकारक ग्रहमान आहे.
आजचा रंग –नारंगी

वृषभ

पांडुरंगाय नम:. मोठे व्यावसायिक धाडस करू नये. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. व्यवसायामध्ये जुन्या हितसंबंधामधून लाभाची शक्यता आहे. अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील. दिवसाचे नियोजन उत्तम पध्दतीने करावे. दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे.
आजचा रंग – हिरवा

मिथुन

श्रीधराय नम:. व्यावसायिक वाढीचा दिवस आहे. व्यवसायामध्ये नावीन्यपूर्ण बदल करू शकाल. महत्त्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करता येर्इल. कौटुंबिक सौख्य लाभेल. पतीपत्नींमधील दुरावा कमी होर्इल.
आजचा रंग –आकाशी

कर्क

विठ्ठलाय नम:. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. मोठे आर्थिक उलाढाल करताना चर्चा. सल्लामसलत करावी. प्रवास करता असताना दक्षता बाळगावी. वाताचे विकार असलेल्यांनी प्रकॄतीची काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी प्रकॄतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग –पिवळा

सिंह

महेंद्राय नम:. महत्त्वकांक्षी निर्णय घेऊ शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. नोकरदार मंडळींना आर्थिक लाभाचा दिवस आहे. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग -नारंगी

कन्या

आदिदेवाय नम:. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडविता येतील. महत्त्वपूर्ण आर्थिक घडामोडींचा दिवस आहे. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडविता येतील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, जमिनीचे खरेदीविक्री करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहेत. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –गुलाबी

तुळ

पवनसुताय नम:. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. भावंडांशी गाठीभेटी होतील. महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. व्यवसायामध्ये स्पर्धेचे वातावरण असेल. प्रगतीकारक ग्रहमान आहेत.
आजचा रंग -नारंगी

वृश्चिक

गुणवंताय नम:. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. उत्तम नियोजनाचा दिवस आहे. नोकरदारमंडळींना नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक स्थितीमध्ये सुधार होर्इल. नोकरीमध्ये अनुकूल ग्रहमान राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रहमान उत्तम आहे.
आजचा रंग –पांढरा

धनु

आत्मनंदाय नम:. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वपूर्ण व्यावसायिक घडामोडींसाठी अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासाचे योग संभवतात. नवीन कामांची सुरूवात करू शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यवसायिकांसाठी ग्रहमान अनुकूल. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग –निळा

मकर

दामोदराय नम:. मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपाणे करावे. जमिनीमधील गुंतवणूक करत असताना कायदेशीर गोष्टींचा विचार करावा. सर्वांचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळवेत. प्रवास जपून करावे.
आजचा रंग –तपकिरी

कुंभ

सरस्वतेय नम:. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. सर्वांचे सहकार्य प्राप्त होर्इल. सर्व प्रकारच्या गुंतवणुकीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसायिक हितसंबंध दॄढ करता येतील.
आजचा रंग-पांढरा

मीन

स्वरूपानंदाय नम:. अधिकारी वर्गासाठी महत्त्वाचा दिवस आहे. महत्त्वकांक्षी योजना राबविता येतील. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. वरिष्ठांकडून कौतुक होर्इल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu