- मेष:-
कौटुंबिक कामात गढून जाल. मैत्री अधिक दृढ होईल. घरगुती वातावरणात रमाल. अचानक लाभाची शक्यता. मित्रांच्या संगतीत रमाल. - वृषभ:-
कामाला योग्य गती मिळेल. भावंडांची उत्तम साथ लाभेल. सहकुटुंब सहलीची मजा घ्याल. आवडते पुस्तक वाचाल. - मिथुन:-
गोड बोलण्यावर भर द्याल. कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्याल. गोड पदार्थ चाखायला मिळतील. तुमच्या कौतुकात भर पडेल. विरोधकांवर लक्ष ठेवा. - कर्क:-
उत्तम मानसिक स्वास्थ लाभेल. नवीन गुंतवणूक कराल. गायन कलेत प्रगती होईल. सर्वांशी आपुलकीने जवळीक साधाल. आवडीच्या कामात गुंग व्हाल. - सिंह:-
आलेली संधी दवडू नका. दिवस चैनीत घालवाल. उत्साहाने कामे हाती घ्याल. संयम व सारासार विचार यांवर अधिक भर द्यावा. भडक शब्द टाळावेत. - कन्या:-
व्यावसायिक स्तर उंचावेल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. वायफळ खर्च टाळावा. कामाच्या पद्धतीत योग्य तो बदल करावा. वैवाहिक सौख्यात रमून जाल. - तुळ:-
स्त्री समुहात वावराल. मैत्रीचे संबंध जपावेत. व्यावसायिक मान वाढेल. व्यवसायाच्या दृष्टीने अनुरूप गोष्टी घडतील. कामाचे कौतुक केले जाईल. - वृश्चिक:-
कामातील बदल लक्षात घ्यावा. निष्ठा ढळू देवू नका. व्यावसायिक संबंध जपावेत. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. दिवस मजेत घालवाल. - धनु:-
क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. फार चिंता करु नये. कमी कष्टात लाभ संभवतो. अचानक धनलाभाची शक्यता. कफ विकार जाणवतील. - मकर:-
कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही. गैरसमजापासून दूर राहावे. हातातील कामात यश येईल. जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात अधिक भर पडेल. काही गोष्टीत तडजोड करावी लागेल. - कुंभ:-
गृह्सौख्याकडे लक्ष द्यावे. परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा. कफविकार जाणवतील. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. अधिकार वाणीने बोलाल. - मीन:-
आपले मत इतरांना पटवून द्यावे. भांडणात अडकू नका. मुलांच्या आनंदात रममाण व्हाल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. कामाचा आनंद घ्याल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, बुधवार, २८ ऑगस्ट २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 28-08-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 28 august 2019 aau