मेष
आजचा दिवस गेल्या तीन चार दिवसांपेक्षा सुखकर असणार आहे. त्यामुळे मागे राहिलेली कामे मार्गस्थ करण्याचा उत्तम दिवस आहे. ओम श्री नमः या बीज मंत्राचा जप करणे.
आजचा रंग- तपकिरी
वृषभ
संमिश्र फळे देणारा दिवस आहे. नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा. महत्त्वाकांक्षी योजना आज राबवू नयेत. कालभैरवाष्टक म्हणावे.
आजचा रंग – तपकिरी
मिथुन
आज धनु राशीतील चंद्र उत्तम फळे देणारा आहे. त्यामुळे पूर्ण प्रयत्न करावेत. व्यवसायाच्या आर्थिक गोष्टी मार्गी लावण्यासाठी दिवस योग्य आहे. आज दिवसाच्या प्रत्येक मिनिटांचा उपयोग करुन घ्यावा. विद्यार्थ्यांनी ज्या गोष्टी अडतात, समजत नाहीत त्या गोष्टीचे शंका निरसन करुन घ्यावे, दिवस योग्य आहे. ओम शुक्राय नमः हा जप करावा.
आजचा रंग – तपकिरी
कर्क
आज सकाळपासूनच चंद्राचे धनु राशीत भ्रमण आहे. सावध राहून कामे करावीत, कुणालाही गृहित धरू नये. वाहने सावकाश चालवावी. स्त्रियांनी वादविवाद टाळावेत. बॅंक कर्मचाऱ्यांनी अकाउंट्समधल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. गणपती मंदिरात लाल फुले अर्पण करावी.
आजचा रंग – पिवळा
सिंह
आज सकाळपासूनच चंद्राचे धनु राशीत भ्रमण आहे. दीर्घकालीन यशदायी प्रगतीसाठी आज काही योजनांची सुरुवात करावी. उत्तम यश मिळेल. आर्थिक बाजू बळकट होईल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल. नवीन संधी उपलब्ध होतील. गणपती मंदिरात गुळ खोबरे ठेवून दिवसाचा प्रारंभ करावा.
आजचा रंग – तपकिरी
कन्या
आज सकाळपासूनच चंद्राचे धनु राशीत भ्रमण आहे. याचे फायदे होणार आहेत. परंतु महत्त्वाची कामे वेळेच्या आत करावीत. ज्येष्टांशी सल्ला मसलत करावी. विचार विनिमय करुन महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. गणपती मंदिरात दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – नारंगी
तुळ
आज सकाळपासूनच चंद्राचे धनु राशीत भ्रमण आहे. सहकार्य लाभेल. परदेशी व्यापार, व्यवसाय, नोकरी करणाऱ्यांना उत्तम संधी येतील. प्रवासाची दगदग वाढेल. गणेश अष्टक म्हणून दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – गुलाबी
वृश्चिक
आज सकाळपासूनच चंद्राचे धनु राशीत भ्रमण आहे. हे भ्रमण आशादायक आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. शनीच्या प्रभावामुळे निर्माण झालेली आर्थिक चणचण कमी होईल. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक दिवस असेल. स्त्रियांनी आजाराकडे दुर्लक्ष करू नये. ओम श्री भानवे नमः चा जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – तपकिरी
धनु
आज सकाळपासूनच चंद्र धनु राशीत असणार आहे. साडेसातीचा त्रास कमी होईल. आर्थिक नियोजन करू शकाल. सहकार्याचे मार्गदर्शन लाभेल. ओम श्री नमः बीज मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – तपकिरी
मकर
आज सकाळपासूनच चंद्र धनु राशीत असणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. मुलांची चिडचिड वाढू शकते. आर्थिक व्यवहार जपून करणे, कायदेशीर गोष्टींचा विचार करुन व्यवहार करावेत. कालीमातेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी
कुंभ
आज सकाळपासूनच चंद्र धनु राशीत असणार आहे. आज मोठे निर्णय स्थगित ठेवावे. अधिकाऱ्यांशी जुळवून घेणे. महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. वाहने जपून चालवावीत. देवापुढे तुपाचा दिवा लावावा. ओम क्लींम श्री या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा
मीन
आज सकाळपासूनच चंद्र धनु राशीत असणार आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस, आर्थिक प्रश्न सुटतील. संततीचे प्रश्न सुटतील. अस्वस्थता कमी होईल. देवी कवचाचे पाठ करावेत.
आजचा रंग – पिवळा
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu