1. मेष:-
    मानसिक चंचलता जाणवेल. घरापासून दूर जावे लागेल. पत्नीशी किरकोळ कारणावरून मतभेद संभवतात. जुनी येणी वसूल होतील. हातातील अधिकार वापरावे.
  2. वृषभ:-
    जोडीदाराचे वर्चस्व राहील. एकमेकांची बाजू समजून घ्यावी. काही गोष्टी मनाविरूद्ध वाटू शकतात. कोर्ट कचेरीची कामे तूर्तास टाळावीत. मनातील इच्छा पूर्ण होईल.
  3. मिथुन:-
    कामात चंचलता दाखवू नका. एकसूत्रतेने कामे करावीत. पोटाची काळजी घ्यावी. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या.
  4. कर्क:-
    सहृदयतेने मदत कराल. परोपकाराची जाणीव ठेवा. भावनिक गुंतागुंत जाणवेल. काही लाभ अचानक होतील. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे.
  5. सिंह:-
    वैवाहिक सौख्य बहरून येईल. दूरच्या गावी जाण्याचे योग येईल. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. शेअर्स मधून काही फायदा संभवतो. अचानक धन लाभाची शक्यता.
  6. कन्या:-
    हाताखालील नोकरांचे सहकारी लाभेल. कौटुंबिक गरजा भागवता येतील. प्रवासात सावधगिरी बाळगावी. मनातील अकारण भीती बाजूस सारा. भागीदारीत फायदा होईल.
  7. तूळ:-
    प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांची मदत मिळेल. अनाठायी खर्च वाढू शकतो. हातातील कामात चिकाटी ठेवा. प्रकृतीची काळजी घ्यावी.
  8. वृश्चिक:-
    फार हट्टीपणा करू नका. अतिउत्साह दाखवू नका. पित्तविकार बळावू शकतो. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. पराक्रमाला वाव मिळेल.
  9. धनू:-
    जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. हातापायांची दुखणी त्रासदायक ठरू शकतात. कौटुंबिक खर्च वाढेल. आवक-जावक ह्यांचे योग्य गणित मांडा. गैर-समजुतींपासून दूर रहा.
  10. मकर:-
    मित्र-मंडळींशी मतभेद संभवतात. सामाजिक कार्यात मदत कराल. अतिअपेक्षा बाळगू नका. कौटुंबिक अडचणींतून मार्ग काढता येईल. अध्यात्मिक प्रगती होईल.
  11. कुंभ:-
    नसत्या प्रकरणात अडकू नका. काही बदलांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जाणवेल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. थोरांशी मतभेद संभवतात.
  12. मीन:-
    आवडत्या कामात अधिक लक्ष्य द्यावे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. औद्योगिक वाढ करणे शक्य होईल. अधिकार्‍यांची भेट होईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader