- मेष:-
मानसिक चंचलता जाणवेल. घरापासून दूर जावे लागेल. पत्नीशी किरकोळ कारणावरून मतभेद संभवतात. जुनी येणी वसूल होतील. हातातील अधिकार वापरावे. - वृषभ:-
जोडीदाराचे वर्चस्व राहील. एकमेकांची बाजू समजून घ्यावी. काही गोष्टी मनाविरूद्ध वाटू शकतात. कोर्ट कचेरीची कामे तूर्तास टाळावीत. मनातील इच्छा पूर्ण होईल. - मिथुन:-
कामात चंचलता दाखवू नका. एकसूत्रतेने कामे करावीत. पोटाची काळजी घ्यावी. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या. - कर्क:-
सहृदयतेने मदत कराल. परोपकाराची जाणीव ठेवा. भावनिक गुंतागुंत जाणवेल. काही लाभ अचानक होतील. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. - सिंह:-
वैवाहिक सौख्य बहरून येईल. दूरच्या गावी जाण्याचे योग येईल. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. शेअर्स मधून काही फायदा संभवतो. अचानक धन लाभाची शक्यता. - कन्या:-
हाताखालील नोकरांचे सहकारी लाभेल. कौटुंबिक गरजा भागवता येतील. प्रवासात सावधगिरी बाळगावी. मनातील अकारण भीती बाजूस सारा. भागीदारीत फायदा होईल. - तूळ:-
प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांची मदत मिळेल. अनाठायी खर्च वाढू शकतो. हातातील कामात चिकाटी ठेवा. प्रकृतीची काळजी घ्यावी. - वृश्चिक:-
फार हट्टीपणा करू नका. अतिउत्साह दाखवू नका. पित्तविकार बळावू शकतो. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. पराक्रमाला वाव मिळेल. - धनू:-
जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. हातापायांची दुखणी त्रासदायक ठरू शकतात. कौटुंबिक खर्च वाढेल. आवक-जावक ह्यांचे योग्य गणित मांडा. गैर-समजुतींपासून दूर रहा. - मकर:-
मित्र-मंडळींशी मतभेद संभवतात. सामाजिक कार्यात मदत कराल. अतिअपेक्षा बाळगू नका. कौटुंबिक अडचणींतून मार्ग काढता येईल. अध्यात्मिक प्रगती होईल. - कुंभ:-
नसत्या प्रकरणात अडकू नका. काही बदलांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जाणवेल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. थोरांशी मतभेद संभवतात. - मीन:-
आवडत्या कामात अधिक लक्ष्य द्यावे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. औद्योगिक वाढ करणे शक्य होईल. अधिकार्यांची भेट होईल.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, बुधवार, २९ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 29-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 29 january 2020 aau