• मेष:-जवळचा प्रवास कराल. प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगाल. चार-चौघांत मिळून मिसळून वागाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
  • वृषभ:-मानसिक चंचलता जाणवेल. कमिशनमधून फायदा होईल. द्विधा मनस्थितीवर मात करावी. गैरसमजापासून दूर राहावे. आवडीनिवडींबाबत दक्षता बाळगाल.
  • मिथुन:-वेळेचे बंधन पाळावे लागेल. आपली छाप पडण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लोकोपवादाला बळी पडू नका. चुकीच्या संगतीत अडकू नका.
  • कर्क:-मानसिक स्थैर्य जपावे. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष नको. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. विरोधकांचा रोष मावळेल. हातातील कामात यश येईल.
  • सिंह:-जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. चोरांपासून सावध राहावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. अपचनाचा त्रास जाणवेल.
  • कन्या:-नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनातील निरूत्साह काढून टाकावा. कौटुंबिक त्रासातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. वारसाहक्काची कामे लाभदायक ठरतील. अती अपेक्षा बाळगू नका.
  • तूळ:-अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी. नातेवाईकांना मदत कराल. मनातील अकारण भीती दूर सारावी. मुलांचे विचार समजून घ्यावेत.
  • वृश्चिक-अकारण होणारा खर्च टाळावा. भडक शब्दांचा वापर करू नये. गुंतवणूक करताना सतर्क राहावे. मनातील द्वेष दूर करावा. हातातील कामे सुरळीत पार पडतील.
  • धनू:-आहाराकडे लक्ष ठेवा. पित्त विकार वाढू शकतात. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष नको. मानसिक स्थैर्य जपावे. चुकीच्या विचारांना खत-पाणी घालू नका.
  • मकर:-आवाक्याबाहेर खर्चाचा ताळमेळ घालावा. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. फसवणुकीपासून सावध राहावे. नातेवाईकांशी समझोता करावा लागेल.
  • कुंभ:-कामातील दिरंगाई टाळावी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. मानापमानात अडकू नका. मित्रांचा रोष ओढावेल. कोर्ट कचेरीच्या कामात वेळ जाईल.
  • मीन:-झोपेची तक्रार दूर करावी. मनातील निराशाजनक विचार दूर करावेत. कौटुंबिक खर्चाचे गणित मांडावे. घरगुती कामात चाल-ढकल करू नका. कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 4th march 2020 scj
Show comments