मेष

मेष राशीला चंद्र व्ययात आहे. त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टींचे निर्णय मोठी उलाढाल करताना सल्लामसलत करावी. ओम श्री बुधाय नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – राखाडी

वृषभ

भावंडांचे, आप्तस्वकीयांचे, भेटीगाठींचे योग दिसतात. ग्रहसौख्याचे दिवस. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

मिथुन

कार्यक्षेत्रातील नवीन ओळखी वाढतील. नवीन संधी निर्माण होतील. कुलदैवतांचे स्मरण करणे.
आजचा रंग – निळा

कर्क

नवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी योग्य दिवस. वेळेचे बंधन पाळावे. घरांमध्ये तुपाचा दिवा लावून ओम श्री नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – तेजस्वी पिवळा

सिंह

दूरचे प्रवास टाळावेत. मर्यादित वेगाने वाहने चालवावीत. सकाळी गणपती दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

कन्या

जुन्या आठवणीत दिवस जाण्याची शक्यता. जुने मित्र मंडळी भेटण्याचे योग. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

तूळ

दगदगीच्या प्रवासाचे योग. वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक

आनंदी वार्ता समजण्याची शक्यता. संतती सौख्य लाभेल. गणपती मंदिरामध्ये तांबडे फुल अर्पण करावे.
आजचा रंग – लाल

धनु

वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. कायदेशी बाबी तपासाव्यात. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

मकर

नवीन वस्तू खरेदी कराल. व्यवसायात प्रगती. शिवमानस पुजेचे वाचन करावे.
आजचा रंग – करडा

कुंभ

आर्थिक स्थिती सुधारेल. पैशांचे नियोजन करता येईल. कुलस्वामिनीची ओटी भरावी.
आजचा रंग – फिक्कट हिरवा

मीन

योग्य नियोजन केल्यास पुढील अनेक दिवस धनप्राप्ती होईल. गणपती अष्टक म्हणावे.
आजचा रंग – तपकिरी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader